Chandrashekhar Bawankule News : आज बावनकुळेंनी सांगूनच टाकले की, अजित पवारांनी तेव्हा...

Nagpur : म्हणून ओबीसी शिबिर घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule and Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar : सत्तेच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने ओबीसींसाठी कुठलंही ठोस काम केलेलं नाही. म्हणून ओबीसी शिबिर घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (NCP has not done any concrete work for OBCs)

आज (ता. १) आमदार बावनकुळे नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यानंतर कुठे राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला. त्यापूर्वी केंद्रात आणि राज्यात त्यांचेच सरकार होते, पण ते लोक हे काम करू शकले नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदावर आले तेव्हा कुठे ओबीसी मंत्रालय मिळाले. नंतर महाज्योती आले, त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा तिढा आवाक्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी ओबीसी समाजासाठी काहीच काम केले नाही. त्यामुळे आज त्यांच्यावर ओबीसी शिबिर घेण्याची वेळ आली आहे. येत्या ३ व ४ जून रोजी नागपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओबीसी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात आमदार बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.

ओबीसी आरक्षणासाठी इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ५१४ कोटी रुपये हवे होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार होते. त्यांनी ५१४ कोटी रुपयांच्या ओबीसी आयोगाच्या मागणीची फाईल फेकून दिली होती. त्यानंतरही त्या सरकारमधील मंत्र्यांनी ती फाईल धुळखात ठेवली होती. त्यावेळी ओबीसी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार होते. वाटल्यास त्यांना ही बाब विचारा, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule and Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule बघा काय म्हणाले ? BJP । Ajit Pawar । NCP । Sarkarnama video

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचं सरकार आलं तेव्हा कुठे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळाले. या लोकांनी ओबीसीच्या नावाने नुसता खोटारडेपणा केला आहे. या लोकांनी ओबीसींसाठी केंद्रात आणि राज्यातही काहीच केले नाही. आता ओबीसी मतांवर डोळा ठेऊन अशी शिबिरे घेतली जात आहे. पण ओबीसी समाज हुशार आहे. त्यांच्या या डावाला जनता बळी पडणार नाही. हे त्यांचे ढोंग आहे, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.