Chandrashekhar Bawankule News : नागपुरात कोराडी रोडवर पागलखाना चौक आहे, बावनकुळेंनी कुणाला सांगितलं ?

Maharashtra : चार-पाच पेक्षा जास्त वेळ निवडून आलेले नेते मंत्रिमंडळात आहेत.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray Group : अजित पवारांनी एकदा शब्द दिला की मोडत नाही आणि आम्हीही शब्दावर ठाम असतो. या तिघांमध्ये एकही नेता पाठीत खंजीर खुपसणारा नाही. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही. विरोधक आमच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न करीत आहेत. पण यामध्ये त्यांना यश मिळणार नाही, असा ठाम विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. (The opposition is trying to divide us)

आज (ता. आठ) नागपुरात भाजपचे घर चलो अभियान सुरू झाले. यावेळी आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. अधिवेशनाच्या केवळ दोन दिवस आधी मंत्रिमंडळ विस्तार झाला. अशा परिस्थितीत सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालणार नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर चार-पाच पेक्षा जास्त वेळ निवडून आलेले नेते मंत्रिमंडळात आहेत. ते एका दिवसात खात्याचे काम समजून घेतात. अधिवेशनात सर्व प्रश्‍नांची उत्तरे मिळतील. कामकाज सुरळीत चालेल, असे बावनकुळे म्हणाले.

फाईल्सचा प्रवास व्हाया देवेंद्र फडणवीस होतो, या आरोपावर बोलताना यावर असे असेलही तर काय फरक पडतो. तीन पक्षांचे सरकार आहे. आयडीया शेअर झाल्या पाहिजे. तिघांनीही मिळून फाइली बघितल्या. तर त्याचा फायदा महाराष्ट्राला अधिक होणार आहे, असे ते म्हणाले. ठाकरे गटाचे लोक काय बोलतात, त्यांचं त्यांनाच कळत नाही. त्यासाठी नागपुरात पागलखाना चौक आहे. तेथे मेंटल हॉस्पिटल आहे. ठाकरे गटाच्या काही लोकांना तेथे भरती होण्याची गरज आहे, असा जोरदार टोला बावनकुळेंनी हाणला.

अमोल मिटकरी आणि निलेश राणे यांच्या वादाबाबत विचारले असता, एका घरात भावाभावांतही कधी कधी मतभेद होत असतात. पण ते मनभेद नसतात. आता तीन पक्ष एक झाले आहेत, तर अशा लहान मोठ्या गोष्टी होतीलही कदाचित. राणे आणि मिटकरी दोघेच तो विषय संपवतील. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मनभेद नाहीत. आता अमोल मिटकरी आमचे सहकारी आहेत. ते आमचंही काम करतील. कारण त्यांचा पिंड काम करण्याचा आहे, असे म्हणत त्यांनी आमदार मिटकरींचे कौतुक केले.

Chandrashekhar Bawankule
Bawankule News : तेव्हा फडणवीसांना अभिमन्यूसारखं घेरलं होतं, आता ठाकरे नैराश्‍याच्या गर्तेत गटांगळ्या खात आहेत...

अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघावर राणा दाम्पत्य आणि शिंदे (Eknath Shinde) गटानेही दावा केला आहे. यावर अमरावतीच्या प्रश्‍नावर केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल. त्यामुळे आत्ताच त्या गोष्टीची चर्चा करण्याची काहीही गरज नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले. भाजपच्या (BJP) घर चलो अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील भाजपचे सर्व नेते व कार्यकर्ते तीन कोटी घरांपर्यंत पोहोचणार असून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती ते सर्वांना देणार आहेत, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

chandrashekhar bawankule, balvant wankhede
MPSC V Radha Committee
Chandrashekhar Bawankule Warns Banks
Chandrashekhar Bawankule