Chandrashekhar Bawankule : भाजपने निलंबित केलेल्या माजी आमदाराचं खुद्द बावनकुळेंनीच केलं जाहीरपणे कौतुक!

BJP Chandrashekhar Bawankule News : जाणून घ्या, नेमके कोण आहेत हे माजी आमदार आणि आता बावनकुळे त्यांना नेमकं काय म्हणाले आहेत?
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule to Mallikarjuna Reddy : रामेटक विधानसभा मतदारसंघ महायुतीने शिवसेनेसाठी सोडल्याने याच मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी चांगलेच संतापले होते. त्यांनी भाजप नेत्यांचे डोके ठिकाणावर नाही, अशी जळजळीत टीकाही केली होती. सोबतच बंडाचे निशाण फडकावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना तत्काळ सहा वर्षांसाठी निलंबित केले होते.

मात्र यास अवघे दोन महिने लोटले असताना बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी रेड्डी यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. तब्बल ८५ शब्दांच्या पत्राद्वारे तुमच्या समर्पित योगदानाबद्धल मला आदर आणि अभिमान वाटतो, पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा यातून तुमची दिसून येते असे त्यांनी म्हटले आहे.

Chandrashekhar Bawankule
George Fernandes : कामगार नेता ते 'जॉर्ज द जायंट किलर' , असा होता जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रवास

२०१४च्या विधानसभेच्या निवडणुकीत रेड्डी यांनी रामेटक विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना पराभूत केले होते. त्यानंतरच्या निवडणुकीत जयस्वाल यांनी पराभवाची परतफेड केली होती. सेटिंग गेटिंगच्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ महायुतीने शिवसेनेसाठी सोडला. जागावाटप होण्याच्या आधीच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी रामटेक मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमात आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे रेड्डी चांगलेच संतापले होते.

Chandrashekhar Bawankule
Kumbh Mela 2025 : संगम नोज घाटावरचं महाकुंभमेळ्यात का होते इतकी गर्दी?

जयस्वाल यांच्या नावाला त्यांनी उघडपणे विरोध केला होता. त्यांच्या समर्थनार्थ शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणाही रेड्डी यांनी केली होती. पक्षाच्या नेतृत्वावर त्यांनी डोके ठिकाणावर आहे का? अशा शब्दात तोफ डागून रेड्डी डागली होती. त्यांनी आपली सर्व ताकद उद्धव ठाकरेंचे उमेदवार विशाल बरबटे यांच्यामागे लावून भाजप परतीचे आपले दरवाजे बंद केले होते.

मात्र राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे झाले गेले विसरून भाजपने(BJP) त्यांना माफ केल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर बावनकुळे यांनी त्यांची प्रशंसा करणारे पत्र देखील रेड्डी यांना लिहले आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वात आपण हजार सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निमाणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्या बद्धल आपले मनःपूर्वक अभिनंदन. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्धल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो असे बावनकुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratanaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com