Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही? मंत्री बावनकुळेंनी सांगितली टेक्निकल गोष्ट

Parth Pawar land deal case News : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमिनीच्या रजिस्ट्रीमध्ये लिहून घेणारे आणि देणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात पार्थ पवार यांचे नाव नसल्याचे स्पष्ट केले.
 Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : पार्थ पवार यांची खरेदी केलेल्या जमिनवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबत निर्णय घेतला तोच अजित पवार यांच्याबाबत घ्यावा, अशी मागणी केली आहे. यामुळे महायुती सरकराची मोठी अडचण झाली आहे. यावर भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमिनीच्या रजिस्ट्रीमध्ये लिहून घेणारे आणि देणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यात पार्थ पवार यांचे नाव नसल्याचे स्पष्ट केले.

चौकशी समितीच्या अहवालात ज्या दोषींची नावे पुढे येतील त्यापैकी कोणालाही सोडणार असे अजित पवार यांनीच जाहीर केले आहे. या प्रकरणाची शंभर टक्के चौकशी होईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला. शीतल तेजवाणी यांचेही नाव समोर आले आहे. यावर कोणाचा काय रोल आहे हे अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल. अण्णा हजारे जे बोलले, विरोधक जे काही आरोप करीत आहे, मागणी करीत आहे, त्यावर चौकशी समितीचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी दिली.

 Chandrashekhar Bawankule
BJP local strategy : अमित शाहांच्या आदेशानंतर आता 'स्थानिक'साठी भाजप कुबड्या काढणार? शिंदे-अजितदादांची राजकीय कोंडी; महायुतीत 'स्वबळाचा' स्फोट होणार?

या संदर्भात महसूल खात्याचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्या आधारे तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी, मुद्रांकाचे डॉक्युमेंट्स तयार करणारे, कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील, नोंदणीच्या वेळी ज्यांनी सही केल्या ते पहिल्या टप्प्यात जे आम्हाला आढळले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

 Chandrashekhar Bawankule
BJP Controversy: ईश्वरपूर भाजपमध्ये जुना- नवा वाद उफाळला, सम्राट महाडिकांनी मुलाखती घेताच विक्रम पाटलांनी घरीच केला 'कार्यक्रम'

आता प्राथमिक चौकशीत जे दोषी दिसले त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई आणि गुन्हे दाखल केले आहेत. याची सखोल चौकशी महसूल खाते करत आहे. मी महसूलमंत्री झालो तेव्हा 1992-93 पासून 13 हजार फाईल पेंडिग होत्या. 800 हियरिंग पूर्ण केल्या आणि 700ते 800 क्लोज फॉर ऑर्डर केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray Video : 'त्या' चर्चांमधील उद्धव ठाकरेंनी हवाच काढली; एकनाथ शिंदेंसोबत युतीबाबत स्पष्ट संदेश, म्हणाले 'निवडणुकीनंतरही...'

पुढच्या तीन वर्षात महसूल खात्यातील संपूर्ण हिअरिंग संपल्या पाहिजे, असे आपले प्रयत्न आहेत. राज्यातील महायुती सरकारकडून व आम्ही प्रत्येक जिल्ह्यात लोक अदालत घेऊन त्याच स्तरावर प्रश्न सोडवण्याचे ठरवले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

 Chandrashekhar Bawankule
साम, दाम, दंड, भेदाने शिवसेनेला धडा शिकवू : नीलेश राणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com