Maharashtra Government : ‘आका, खोके आणि कोयता गँग' एवढे सोडले तर महाराष्ट्राला..! फडणवीस सरकारवर सपकाळ बरसले
Maharashtra Congress reaction : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने वर्षपूर्ती केली. वर्षभरात सरकारने काय-काय केले, याचा लेखाजोखा मांडला जात आहे. सत्ताधाऱ्यांमार्फत सरकारचे अभिनंदन केले जात असताना विरोधक मात्र सर्व दावे फोल असल्याचा आरोप करीत आहे. या सरकारने वर्षभरात ‘आका, खोके आणि कोयता गँग' एवढे सोडले तर महाराष्ट्राला काहीच दिले नसल्याची खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पुढील वर्षात त्यांची कारकीर्द सुधारावी, अशा शुभेच्छाही सपकाळ यांनी फडणवीस सरकारला दिल्या. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्लीत गहाण ठेवले आहे. कुठल्याही लोकशाहीचे संकेत पाळले जात नाही. नाशिक पालकमंत्री कोण राहील, याचाही निर्णय वर्षभरात या सरकारला घेता आला नाही.
विधानसभेत चर्चेऐवजी यांचे मंत्री रमी खेळतात. केवळ सत्तेसाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यांना सत्तेशिवाय काही दिसत नाही. पुरोगामी आणि महाराष्ट्र धर्म, राजधर्म यांना निभावता येत नाही. हे सरकार अधर्मी आहे. त्यांचे आपसातच टोळीयुद्ध सुरू असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.
जाती जातीचा भांडणे लावली जात आहेत. आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी सरकार मात्र पंतप्रधानांचा नाम जप करण्यात व्यस्त आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी या सरकारने साधा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नाही, असे सपकाळ म्हणाले.
महायुतीचे नेते वारंवार दिल्लीत चकरा मारतात. जाता येताना त्यांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज घेऊन यावे आणि बिघडलेली अर्थव्यवस्था दुरुस्त करावी, असा सल्लाही सपकाळ यांनी दिला. औरंगजेबाची क्रूर कारकीर्द होती, असे सांगून सपकाळ यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळाशी त्याची तुलना केली. आता पुढील वर्षात या सराकरची कारकीर्द सुधारावी, अशा शुभेच्छा देताना त्यांनी महाराष्ट्राचं चांगभलं व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
