Ajit Pawar On Shekhar Bagade : भाजप-शिवसेनेच्या वादाला अजितदादांची फोडणी; पोलीस अधिकारी शेखर बागडेंची कुंडलीच मांडली

Police Officer Shekhar Bagade : एका पोलीस निरीक्षकाकडे एवढी मालमत्ता कुठून आली?
Ajit Pawar On Shekhar Bagade
Ajit Pawar On Shekhar BagadeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. बागडे यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता जमा करुन ठेवली असल्याच्या गंभीर आरोप करण्यात येत आहे. बागडेंनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचं आता समोर आलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे (Shekhar Bagde)गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भाजपचे मंडळ अधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपाने मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बागडे यांनी कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचा आरोप भाजपाने केला होता.

Ajit Pawar On Shekhar Bagade
Devendra Fadnavis is upset: मुख्यमंत्र्यांसोबतचे व्यासपीठ सलग दुसऱ्या दिवशी फडणवीसांनी टाळले !

याचदरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारां(Ajit Pawar)नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेंच्या चौकशीची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील १०० जणांना सरकारी खर्चातून संरक्षण दिले जाते. एका पोलीस निरीक्षकाकडे एवढी मालमत्ता कुठून आली? बेहिशोबी मालमत्ता ते कसे काय गोळा करू शकतात?, सरकारने याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यामुळे बागडेंनी कोट्यवधींची मालमत्ता जमविल्याचं आता उघड झालं आहे.

बागडेंची मालमत्ता...?

पोलीस निरीक्षक शेखर बागडेंची देवळाली कॅम्प बस स्थानकासमोर येथे तीन मजली इमारत आहे. त्याची किंमत २७ लाख ५६ हजार रुपये आहे. तसेच सुंमगल रेसिडेन्सीमध्ये १६०० चौरस फुटांचा फ्लॅट असुन त्याची किंमत १ कोटी रुपये आहे. नाशिक रोडवरील ओम शिवम अपार्टमेंट येथे वडील रामदास बागडेंच्या मालकीचा फ्लॅट जो ४० लाखांना खरेदी केली होती.

तसेच पांदुरली, भगूर येथे शेखर बागडे(Shekhar Bagade) यांचा भाऊ मंगेश बागडेंच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता असून ठाण्यातील पाचपाखाडी येथील गगनगिरी सोसायटीत २००० चौरस फुटांचा फ्लॅट जो २०११ मध्ये एक कोटी २१ लाखांना खरेदी केली होती.

Ajit Pawar On Shekhar Bagade
Ajit Pawar on Shekhar Bagade: पोलीस निरीक्षक शेखर बागडेंच्या संपत्तीची चौकशी करा; अजित पवारांची मागणी

नवी मुंबईतील सानपाडा येथे महावीर अमृत सोसायटीत बागडे पती पत्नीच्या नावावर २४ मजल्यावर फ्लॅट ज्याची किंमत ५ कोटीपर्यंत आहे. याचवेळी रिध्दी सिध्दी कन्स्ट्रक्शन या कंपनीत वडील रामदास बागडे भागीदार आहेत. या कन्स्ट्रक्शनमध्ये २०१८ पर्यंत ३ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता तयार केल्याचं निष्पन्न झालं आहे. याकोट्यवधींची मालमत्ता बागडेंनी आत्तापर्यत जमविल्याचं समोर आलं आहे.

अजित पवारांचा आरोप काय..?

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मानपाडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्यावर कोट्यवधींची मालमत्ता जमविल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी बागडेंचा नाशिकमध्ये एक निवासी फ्लॅट देखील आहे. तसेच चार ते पाच क्रमांकाचे गाळे देखील आहेत. रिद्धी सिद्धी कन्स्ट्रक्टशनमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. नवी मुंबईत त्यांचा फ्लॅट आहे. नाशिकमध्ये एक शेतजमीन आहे. एका पोलीस निरीक्षकाकडे एवढी मालमत्ता कुठून आली? बेहिशोबी मालमत्ता ते कसे काय गोळा करू शकतात? सरकारने याबाबत एसीबीमार्फत चौकशी करावी अशी मागणी अजित पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)कडे केली आहे.

Ajit Pawar On Shekhar Bagade
Ajit Pawar News : 'ठाण्यात पोलीस संरक्षण दिलेले ते १०० जण कोण?'

१०० लोकांना संरक्षण दिलं जातंय...

अजित पवारांनी यावेळी ठाणे जिल्ह्यात १०० लोकांना संरक्षण दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. पवार म्हणाले, ठाणे जिल्ह्यात १०० लोकांना संरक्षण देणाऱ्या व्यक्ती कोण आहेत आणि त्या व्यक्ती कुठल्या क्षेत्रातल्या आहेत. त्याबद्दल मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. पण कुणीही माहिती द्यायला तयार नाही. माझ्या माहितीनुसार, जवळपास १०० लोकांना ठाणे जिल्ह्यात संरक्षण दिलं जातंय असं म्हटलं आहे.

तसेच ठाणे जिल्ह्यात असं काय घडलंय की, १०० लोकांना संरक्षण दिलं जातंय. खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांना सुरक्षा देणं हे लोकसभा आणि विधिमंडळाचं काम आहे. संरक्षण देण्याचा संपूर्ण खर्च हा शासनावर येतो. तो खर्च काही करोडोंच्या घरात जातो. पण सुरक्षा देण्यात आलेल्यांची नावं आणि त्यांचे व्यवसाय काय? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

Ajit Pawar On Shekhar Bagade
Pimpri-Chinchwad News : लाचखोरीत अटक दोघांना; मात्र, आयुक्तांनी निलंबन केले एकाचेच

मुख्यमंत्री शिंदे बागडेंवर कारवाई करणार?

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेंमुळे भाजप- शिवसेनेत मोठा वादंग निर्माण झाला होता. भाजपनंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेत थेट बागडेंची भांडाफोड करताना थेट मालमत्तेची थेट आकडेवारीच जाहीर केली आहे.

तसेच ठाण्यात राहून एखादा पोलीस अधिकारी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी काय जमा करु शकतो असा सवाल उपस्थित करत बागडेंची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)मार्फत चौकशीची मागणी गृहमंत्री फडणवीसांकडे केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बागडेंवर कारवाई करावीच लागणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com