Congress Politics : सत्यजित तांबेची पोहोच किती? वडेट्टीवारांनी एका वाक्यात विषय संपवला...

Rahul Gandhi criticism : आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या वक्तव्य बघता ते फार काही काळ काँग्रेससोबत राहतील असे दिसत नाही. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली तर काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली. यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
Rahul Gandhi, Satyajit Tambe
Rahul Gandhi, Satyajit TambeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 29 May : आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या वक्तव्य बघता ते फार काही काळ काँग्रेससोबत राहतील असे दिसत नाही. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली तर काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केली. यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनाही ते काँग्रेस सोडण्याची शंका आहे. सत्यजितने सत्य बोलणे सोडले आहे. तो आता असत्याचा बाजूने चालला आहे. सत्याची साथ सोडून असत्याला साथ देणे, हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हते. यावरून त्याची पुढची वाटचाल कुठल्या बाजूने सुरू आहे हे स्पष्ट होते आहे.

राहूल गांधी सर्वांना भेटतात, वेळही देतात. काही दिवसांपूर्वी आम्ही त्यांना भेटून आलो. दोन तास चर्चा झाली. मात्र उठसूठ कोणालाही ते कसे भेटणार? असा सवाल उपस्थित करून वडेट्टीवार यांनी सत्यजित तांबेंना टोला लागवला. सत्यजित तांबे विधान परिषदेच्या निवडणुकीपासून प्रकाशझोतात आले होते.

त्यांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली. मात्र, निवडणूक स्वतंत्रपणे लढली. एबी फॉर्म घेऊन त्यांनी आम्हाला दगा दिल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सत्यजित तांबे यांचे मामा, माजी मंत्री व प्रदेशध्यक्ष बाळासाहेबत थोरात यांच्यामध्ये त्यावेळी मोठे वाद झाले होते.

Rahul Gandhi, Satyajit Tambe
Shashi Tharoor News : माझ्याकडे खूप चांगल्या गोष्टी करण्यासारख्या..! अखेर शशी थरूर यांनी तलवार उपसलीच...

बाळासाहेब थोरातांनी त्यावेळी पटोले ज्या मंचावर राहतील त्या कार्यक्रमाला जाणार नाही, अशी घोषणा केली होती. शेवटी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यांच्या नेतृत्वात या वादावर तोडगा काढण्यासाठी एक कमेटीसुद्धा स्थापन करण्यात आली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर वाद क्षमला होता.

मात्र सत्यजित काँग्रेस पक्षात राहणार की नाही याची चर्चा आजही कायम आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात हेसुद्धा पराभूत झाले आहेत. त्यामुळे तांबे यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते राहूल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवर टीका करीत असल्याचे सांगण्यात येते. विजय वडेट्टीवारांनी राज्यात सरकार अस्तित्वात आहे हे दिसून येत नसल्याचा आरोप केला.

Rahul Gandhi, Satyajit Tambe
Vishal Patil : विशाल पाटलांना धक्का? 'दत्त इंडिया'च्या कारभारमुळे वसंतदादा कारखान्यावर गडांतर

राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. पहिल्या पावसाने सरकारच्या विकास कामांच्या दाव्याची पोल खोलली. इतकं मोठ नुकसान झाल्यानंतरही सरकारतर्फे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत या सरकाराला शेतकरीच बांधावर गांडणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com