Vijay Wadettiwar : 'पराभवाच्या भीतीने तारीख पे तारीख', वडेट्टीवारांचा थेट सरकारवर आरोप

BJP vs Opposition : भीती सरकारला वाटत असल्याने सत्तेच्या भरवशावर तारीख पे तारीख करून निवडणुका टाळल्या जात असल्याचा थेट आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार यांनी सरकारवर केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महायुतीचे सरकार लोकांच्या मनातील नाही. काहीतरी गडबड झाली असेल याची शंका प्रत्येकालाच आहे. त्यामुळे आता जनता महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची वाट बघत आहे. आपली जिरवली जाईल ही भीती सरकारला वाटत असल्याने सत्तेच्या भरवशावर तारीख पे तारीख करून निवडणुका टाळल्या जात असल्याचा थेट आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर केला.

महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. मतदारही याची वाट बघत आहे. 50 हजार ओबीसींच्या जागा आहेत. त्यांना त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक होऊ नये अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत तीन वेळा सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका केव्हा होणार असा संभ्रम निर्माण झाला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Vijay Wadettiwar
Dinvishesh 30 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनाही टोला लगावला. शिंदे नाराज नाहीत असे सांगत आहेत. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर ती स्पष्ट दिसत आहे. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होत नाही. ऑनलाईन उपस्थिती दर्शवलात याचा अर्थ काही तरी गडबड असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
Eknath Shinde Politics: गिरीश महाजनांच्या वाटेत एकनाथ शिंदेंच्या रायगडचा घाट!

महायुतीत नवा उदय होणार असे संकेत मध्यंतरी वडेट्टीवार यांनी दिले होते. यानंतर मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो. ही भेट सामंत यांना का झोंबली मला माहित नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कालच एक नियमावली जाहीर केली आहे. अधिकाऱ्यांना गावात मुक्काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Vijay Wadettiwar
Top 10 News : बीड दौऱ्यावर येताच अजितदादांचा मोठा निर्णय; ठाकरेंच्या नेत्याने केलेलं वक्तव्य चर्चेत - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

यापूर्वीसुद्धा असे निर्णय घेण्यात आले होते. मात्र नंतर त्याचे काय झाले कोणालाच ठाऊक आहे. सरकार जोपर्यंत कडक भूमिका घेत नाही तो पर्यंत आदेशाला काही अर्थ नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 70 कोटींचे बोगस बिल काढणाऱ्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, केवळ बोलून चालणार नाही तर कृती करा असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com