राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला : नाना पटोले चिडले

गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने (NCP) भाजपची (BJP) साथ दिली.
Nana Patole Latest News
Nana Patole Latest Newssarkarnama
Published on
Updated on

भंडारा : भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia) पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याची जहरी टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. गोंदियात झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपची (BJP) साथ दिली. यावरुन पटोले यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. (Nana Patole Latest News)

Nana Patole Latest News
नानांच्या प्रेमातील वाघमारेंनी बावनकुळेंची विनंती धुडकावली... अखेर कठोर कारवाई

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवास साधला. यावेळी बोलाताना पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यासोबत माझे बोलणे झाल्यावरसुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.

भंडारा जिल्हा परिषदेतही भाजप आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थाप करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. मात्र, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे नाना पटोले जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात यशस्वी झाले.

Nana Patole Latest News
निवडणुकांची लगबग सुरू : 14 महापालिकांची अंतिम प्रभागरचना 17 मे रोजी जाहीर होणार

वाघमारे यांच्या बंडखोर गटाचे ५ आणि १ अपक्ष अशा सदस्यांनी सर्वाधिक २१ सदस्य असलेल्या काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांना बसपा १, शिवसेना १, वंचित १ आणि अपक्ष २ अशा सदस्यांची साथ मिळाली. तर भाजपमधील आमदार परिणय फुके आणि खासदार सुनिल मेंढे यांच्या ७ सदस्यांनी राष्ट्रवादीची साथ दिली. राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत. भंडारा जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. यामुळे पटोले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या या युतीमुळे त्यांच्यावर सडकून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com