चंद्रपूर ः राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता बाहेर पडत आहे. कोणी भाजपत कोणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहे. सहा महिन्यापासून सातत्याने आउट गोईंग सुरू असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे. आता महापालिकेची निवडणूक जाहीर होणार असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच मराठी चित्रपटाचे निर्माते प्रकाश पाटील मारकवार यांनी पुत्र अजिंक्य यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटात प्रवेश घेतला.
प्रकाश पाटील मारकवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी राहिली. मुल-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकी करिता त्यांनी काँग्रेसला विधानसभेची उमेदवारी मागीतली होती. मात्र काँग्रेसने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश पाटील मारकवार यांनी बंडखोरी केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे मुल बल्लारपूर मतदारसंघाचे नेतृत्व करतात. ते अनेकदा या मतदारसंघातून निवडून येत आहेत. हा मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.
मात्र तो आता पूर्णपणे ढासळला आहे. मागील पस्तीस वर्षापासून तो भाजपने आपल्या ताब्यात घेतला आहे. काँग्रेसमध्ये चांगल्या कार्यकर्त्यानी वाव नाही. ठराविक नेते आपल्या मनमर्जीने भूमिका घेतात. यामुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे, असे सांगत प्रकाश पाटील मारकवार यांनी आता आपली पक्ष सोडण्यामागची भूमिका जाहीर केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दुपट्टा टाकून मारकवार पितापुत्रांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, किसन सेल चे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश पाटील मारकवार यांच्यात कमालीची सामाजिक बांधिलकी आहे.त्यांचा प्रशासनातील अनुभव मोठा आहे.त्यांच्यातील जनमताची भावना अनमोल आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाने आपली संघटनात्मक ताकद भक्कम होईल, असा विश्वास अजित पवारांनी आपल्या फेसबूक वाॅलवर लिहिलेल्या पोस्टमधून व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.