Congress : काँग्रेसने गटबाजीवर शोधला नामी उपाय; थेट राहुल गांधींना समिती करणार रिपोर्टिंग!

Rahul Gandhi Maharashtra Tour : यापूर्वी 2024 मध्ये नाना पटोले अध्यक्ष असताना लोणावळा येथे चिंतन शिबिर घेण्यात आले होते. त्यास काही आमदारांनी दांडी मारली होती. त्यांना कारणे दाखवा नोटीससुद्धा बजावण्यात आली होती. विशेष म्हणजे यापूर्वीच नागपूर महापालिकेची निवडणूक गटबाजीमुळे चांगलीच गाजली होती.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 30 June : काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या गटबाजीने अनेक दिग्गजांना आजवर पराभव पत्करावा लागला आहे. आजच्या पक्षाच्या अवस्थेला गटबाजी हे मोठे कारण असल्याचे सांगण्यात येते. नागपूरमध्ये शहर अध्यक्ष निवडायचा असला तरी राज्यातील नेत्यांना दिल्लीत धाव घ्यावी लागते. हे सर्व बघता आता महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांच्या गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेसने एक समिती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना थेट रिपोर्टिंग करणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची रणनीती जिल्हास्तरावर ठरवली जाणार आहे. निवडणुकांमध्ये होणारी गटबाजी कशी रोखायची, हा मोठा प्रश्न काँग्रेससमोर (Congress) आहे. यासाठी एक समिती तयार करून विभागवार नेत्यांना याची जबाबदारी दिली जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body election) विषयावर सोमवारी (ता. 30 जून) दिल्लीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यास महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, प्रफुल गुडधे आदी उपस्थित होते.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात एक चिंतन शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात पुणे येथे हे शिबिर घेण्याचे ठरले आहे. शिबिरात विविध प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दौरा करणार असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

Rahul Gandhi
Girish Mahajan : ‘अजितदादांनी मला विधानसभेत ओपन सांगितलं होतं, तुझं एक रुपयाचंसुद्धा काम करणार नाही’ : गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

यापूर्वी २०२४ मध्ये नाना पटोले अध्यक्ष असताना लोणावळा येथे चिंतन शिबिर घेण्यात आले होते. त्यास काही आमदारांनी दांडी मारली होती. त्यांना कारणे दाखवा नोटीससुद्धा बजावण्यात आली होती. विशेष म्हणजे यापूर्वीच नागपूर महापालिकेची निवडणूक गटबाजीमुळे चांगलीच गाजली होती.

Rahul Gandhi
Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदर हॉस्पिटलमधील ‘त्या’ व्यक्तीला दोनवेळा केला होता फोन!

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर भरसभेत शाई आणि अंडी फेकण्यात आली होती. त्यामुळे नागपूरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. नंतर काही काही नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com