Girish Mahajan : ‘अजितदादांनी मला विधानसभेत ओपन सांगितलं होतं, तुझं एक रुपयाचंसुद्धा काम करणार नाही’ : गिरीश महाजनांचा गंभीर आरोप

Ajit Pawar News : मी भारतीय जनता पक्षात सर्वांत सिनिअर आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही मी निवडून येण्यात सीनिअर आहे. मी सुरुवातीची चार टर्म विरोधी पक्षाचा आमदार होतो. मला अनेक अमिषे दाखवली गेली.
Girish Mahajan-Ajit Pawar
Girish Mahajan-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 30 June : मी भारतीय जनता पक्षात सर्वांत सिनिअर आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही मी निवडून येण्यात सीनिअर आहे. मी सुरुवातीची चार टर्म विरोधी पक्षाचा आमदार होतो. मला अनेक अमिषे दाखवली गेली. इकडे या, मी तुम्हाला हे करतो, ते करतो, असे सगळ्यांनी सांगितले. माझ्या विचाराशी प्रतारणा करणे, मला शक्यच नाही. मी भारतीय स्वयंसेवक संघाचा बालसेवक, माझी विचारसरणी ठरलेली, माझा विचार पक्का आहे. या विचारांपासून जराही डळमळीत होणार नाही, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

काही लोक परिवारवादात एवढे अडकले की त्यांच्या हातातून पक्षच निघून गेला आहे. मी माझा मुलगा, मी माझी मुलगी आणि माझा जावाई या परिवारावादामुळे आपल्या पक्षाला फटका बसला, हे मान्य करणार आहे की नाही, असा सवाल गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांना केला.

परिवारवादाबाबत चर्चा झाली पाहिजे. पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून, मंत्र्यांकडून विरोधकांना जी वागणूक मिळत आहे. गिरीश महाजन माझे टार्गेट नाहीत. ते माझे मित्र आहेत, आम्ही एकमेकांना मदतही करतो. हे बाजूला ठेवू. पण गिरीश महाजन यांनी अनुभवलेले काँग्रेसचे मंत्री, त्यांनी केलेली कामे, गिरीश महाजन यांना त्यांनी केलेली मदत आणि सध्याचे राजकारण यावर त्यांनी सांगावे, असे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आवाहन केले.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनावर गिरीश महाजन जाहीरपणे सांगितले, अजितदादांनी मला सभागृहात ओपन सांगितले होते की, एक रुपयाचंसुद्धा काम तुझं करणार नाही. माझा आणि त्यांचा समोरासमोर वाद झाला होता, त्या वेळी त्यांनी सगळ्या आमदारांचे अधिकारच काढून घेतले होते. लोकांना दोनशे रुपये मिळण्याची योजना होती, तिचे आमदारांकडील अध्यक्षपद काढून घेतले आणि ते अधिकार पालकमंत्र्यांना दिले. त्यावरून मोठ्या प्रमाणात वाद झाला होता.

Girish Mahajan-Ajit Pawar
Shivsena News : उद्धव ठाकरेंना पुण्यात धक्का; साथ सोडलेल्या आंबेगावातील नेत्याने धरली शिंदेंच्या शिवसेनेची वाट

माझाही अजितदादांसोबत खूप वाद झाला. ते भाषण करत असताना मी त्यांच्या समोर येऊन उभा राहिलो, बोर्ड घेऊन उभा राहिलो होतो, त्यांना टीव्हीवर कुठेही दिसून दिले नाही. त्यामुळे त्यांनी विधानसभेत मला सांगितले होते की, तुला एक रुपयासुद्धा निधी देणार नाही. त्यांनी मला दोन टर्म एक रुपयासुद्धा दिला नाही आणि मीसुद्धा अजितदादांकडे आठ आणेसुद्धा मागायला गेलो नाही. साधी पत्रसुद्धा दिलं नाही.

Girish Mahajan-Ajit Pawar
Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकरांनी आत्महत्येच्या काही मिनिटे अगोदर हॉस्पिटलमधील ‘त्या’ व्यक्तीला दोनवेळा केला होता फोन!

मागाच्या काळातसुद्धा मला प्रचंड त्रास देण्यात आला, माझ्यावर खोटा मोका लावण्यात आला. मी फोनवरून कोणाला तरी धमकी दिली म्हणून पुण्याची केस तीन वर्षे १२ दिवसांनी मुक्ताईनगरला दाखल झाली. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने मला दिलासा दिला म्हणून मी राहिलो. त्यातून रेकॉर्डिंगंमध्ये गिरीश महाजनला कसं फसवलं हे सिद्ध झालं, असेही महाजन यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com