Chandrapur : दिनदर्शिकेवरून कृषी उत्पन्न बाजार समितीत घडले असे काही की...

Gondpipri : गोंडपिपरीत भाजपचा प्रचार होत असल्याचा काँग्रेसचा आरोप; उपनिबंधकांकडे तक्रार
Markt Committee Calendar.
Markt Committee Calendar.Sarkarnama
Published on
Updated on

Market Committee : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपची सत्ता आहे. बाजार समितीच्या स्थापनेनंतर येथे पहिल्यांदाच भाजपने गड जिंकला. अशात सध्या बाजार समितीचे राजकारण चांगलेच पेटले आहे. त्याला कारणीभूत ठरली ती बाजार समितीने काढलेली नवीन वर्षाची दिनदर्शिका. दिनदर्शिका प्रकाशित होताच विरोधक काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला आहे.

बाजार समितीची ही दिनदर्शिका आहे की, भाजपचे प्रचाराचे माध्यम असा सवाल करण्यात आला आहे. काँग्रेसने आता या दिनदर्शिकेची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार समितीमधील राजकारण पेटणार की काय, अशी चिन्हे आहेत. यासंदर्भात काँग्रेसच्या संचालकांनी बाजार समितीच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे.

Markt Committee Calendar.
Chandrapur : स्वतंत्र विदर्भासाठी अहेरी-नागपूर महामार्ग रोखला; वाहतूक ठप्प

गोंडपिपरीच्या बाजार समितीवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. भाजप नेते अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात हीनिवडणूक लढविण्यात आली होती. बाजार समितीवर सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना शेवटपर्यत होता. पण त्यांचे केवळ सहाच उमेदवार निवडून आलेत. अद्यापही काँग्रेस हा पराभव सहन करू शकलेली नाही. अशात गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने नवीन वर्षानिमित्त दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.

दिनदर्शिककेच्या प्रत्येक पानावर भाजपच्या नेत्याचे फोटो छापण्यात आले आहेत. नेमकी हिच बाब काँग्रेस कार्यकर्त्यांना खटकली आहे. दिनदर्शिकेत सभापती, उपसभापती यांचे फोटो आहेत. सोबतच भाजप व काँग्रेस संचालकांची नावे देखील टाकण्यात आली आहेत. परंतु आम्हाला विश्वासात न घेता नावे टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेस संचालकांनी केला आहे. काँग्रेसच्या अशोक रेचनकर, देविदास सातपुते, नीलेश संगमवार, संतोष बंडावार, नारायण वाग्दरकर, प्रेमिला चनेकार या संचालकांसह तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुकाराम झाडे, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, प्रा. शंभू येलेकार, सारनाथ बक्षी यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर बाजार समिती भाजपचा प्रसार करीत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. एकीकडे भाजपच्या नेत्यांचे फोटो दिनदर्शिकेवर छापण्यात आले आहेत तर दुसरीकडे स्थानिक काँग्रेस आमदाराचा फोटो यातून वगळण्यात आल्याचे संचालकांचे म्हणणे आहे. दिनदर्शिका प्रसिद्ध करताना राजशिष्टाचार पाळण्यात आलेला नाही. यापूर्वीही बाजार समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्यातही भाजपचा प्रचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

बाजार समितीच्या माध्यमातून चाललेल्या पक्ष प्रचाराच्या भूमिकेविरोधात आक्रमक झालेले काँग्रेस संचालक बाजार समितीत दिनदर्शिकेची होळी करणार आहेत. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे म्हणाले की, योग्य ठराव घेऊनच दिनदर्शिका छापण्यात आली आहे. या ठरावावर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेस संचालकांनीही स्वाक्षरी केली होती. आतापर्यंत बाजार समितीवर काँग्रेसचीच सत्ता होती. त्यांनी आजपर्यत काहीच केले नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे उपक्रम राबवित आहोत. कोणी कितीही विरोध केला तरी आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काम करीत राहू.

Edited by : Prasannaa Jakate

Markt Committee Calendar.
Chandrapur Crime News : कुलथा मारहाणप्रकरण; शिवसेनेच्या वाहतूक जिल्हा प्रमुख काशीकरवर गुन्हा दाखल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com