Chandrapur : स्वतंत्र विदर्भासाठी अहेरी-नागपूर महामार्ग रोखला; वाहतूक ठप्प

Protest : विदर्भ राज्य आंदोलन समितीने गोंडपिपरीत केले आंदोलन; नागपुरात उपोषण
Road Block in Chandrapur.
Road Block in Chandrapur.Sarkarnama
Published on
Updated on

Vidarbha State Movement : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवादी नेते अॅड. वामन चटप हे नागपूर येथील संविधान चौकात 27 डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील अहेरी-नागपूर महामार्ग रोखण्यात आला.

सुमारे एका तासापर्यंत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. विदर्भवाद्यांच्या या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीासाठी गेल्या काही महिन्यांपासून नेते आक्रमक झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागांपासून चंद्रपूर जिल्ह्यात विविध पद्धतीने आंदोलन केले जात आहे. याच मागणीसाठी नागपुरातील विधानभवनार मोर्चा काढण्यात आला होता.

Road Block in Chandrapur.
Chandrapur Crime News : कुलथा मारहाणप्रकरण; शिवसेनेच्या वाहतूक जिल्हा प्रमुख काशीकरवर गुन्हा दाखल!

आता विदर्भवादी नेते अॅड. वामन चटप यांच्यासह महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामरडे, अरूण केदार ही मंडळी नागपुरातील संविधान चौकात उपोषण करीत आहे. या उपोषणादरम्यान महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामरडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातत्याने विदर्भवाद्यांच्या मागण्याकंडे दुर्लक्ष होत असल्याने चंद्रपुरात आंदोलन सुरू झाले आहे.

स्वतंत्र विदर्भासाठी आता आरपारची लढाई लढण्यासाठी विदर्भवादी नेते सरसावले आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे विदर्भवाद्यांनी अहेरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला. आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनाचे नेतृत्व शालीमराव माऊलीकर, अॅड. रूपेश सुर, जिल्हा उपाध्यक्ष अरुण वासलवार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रफुल आस्वले, आंनद खर्डीवार, शंकर पाल, कमलाकर खोब्रागडे, रविंद्र हेपट, तुकाराम कुत्तरमारे, नरेद्र गणमुकलवार, भाऊजी भोयर, राजेश्वर बट्टे, मारोती मेश्राम, अरुण कुत्तरमारे, अनंत फलके, दिलीप पुलगमकर आदींनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपुरातील संविधान चौकात गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. अशात शासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अर्थात 1 जानेवारी 2024 रोजी विदर्भातील अकराही जिल्ह्यातील कार्यकर्ते नागपुरात दाखल होणार आहेत. विदर्भवाद्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासोबत यावेळी आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविली जाणार आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी बरीच जुनी आहे. गेल्या 118 वर्षांपासून ही मागणी होत आहे. 31 डिसेंबरपर्यंत यासाठी केंद्र सरकारने घटनेच्या कलम तीन प्रमाणे स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वेगळया विदर्भासाठी हा लढा सुरू आहे. परंतु कोणत्याही सरकारने न्याय दिला नाही. त्यामुळे ‘अभी नही, तो कभी नही’ अशी भूमिका यावेळी घेतली आहे. त्याच अनुषंगाने आंदोलनाची धार आता अधिक तीव्र करण्यात आली आहे. आता स्वतंत्रा विदर्भ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे विदर्भवादी नेते अॅड. वामन चटप यांनी सांगितले.

Edited by : Prasannaa Jakate

Road Block in Chandrapur.
Chandrapur News : मुनगंटीवारांनी दिली अशी भेट, शिंदे-फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्यच फुलले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com