Congress Vs NCP SP : 'आम्ही फक्त काँग्रेसच्या सतरंज्या उचलायच्या का..?'; राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा संयम संपला

NCP Sharad Pawar : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात पंधरा वर्षांपासून काँग्रेसचा (Congress) उमेदवार पराभूत होत आहे. 'सांगली पॅटर्न'चा इशारा देणारे आमदार अभिजित वंजारी हेसुद्धा पूर्व नागपूरमधून लढले होते.
sharad pawar | Nana Patole
sharad pawar | Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर शहरात काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नसल्याने उद्धव ठाकरे सेनेसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी नाराजी निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी इतरांना जागा सोडली तर काँग्रेस पॅर्टनचा इशारा दिला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीसुद्धा आक्रमक झाली आहे.

आमच्यासाठीसुद्धा सांगली पॅटनर्चा मार्ग खुला आहे, असा इशारा काँग्रेसला देण्यात आला. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची स्थापना नागपूर शहरात फक्त काँग्रेसच्या सतरंज्या उचलण्यासाठी झाली आहे का?, असा सवालही करण्यात आला.

दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज तातडीने बैठक घेतली. यात पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्याची मागणी करण्यात आली.

पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात पंधरा वर्षांपासून काँग्रेसचा (Congress) उमेदवार पराभूत होत आहे. 'सांगली पॅटर्न'चा इशारा देणारे आमदार अभिजित वंजारी हेसुद्धा पूर्व नागपूरमधून लढले होते.

sharad pawar | Nana Patole
Maratha Protest News : भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या कार्यालयावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न

काँग्रेसची एवढीच ताकद असेल तर ते विजयी का झाले नाही. नंतर त्यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघ का सोडला अशीही विचारणा करण्यात आली. 2014 ची विधानसभा निवडणूक सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे लढली होती. त्यावेळी काँग्रेसचा एकही उमेदवार नागपूरमधून निवडून आला नव्हता.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. या निवडणुकीत काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले. त्यामुळे काँग्रेसने 2014 च्या निवडणुकीचा इतिहास विसरू नये याकडेही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

sharad pawar | Nana Patole
Ichalkaranji Constituency : बावनकुळेंच्या दौऱ्यानंतरही भाजप नेत्याची बंडखोरी; इचलकरंजीत शेळकेंनी दंड थोपटले!

पूर्व नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो केव्हाच ढासळला आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना पराभूत करण्याचा तीनदा काँग्रेसने प्रयत्न केला. मात्र, अद्याप यश आले नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला संधी द्यावी. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीला 20 वर्षे झाले. आजवर विधानसभा आणि लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी शहरात एकही मतदारसंघ सोडण्यात आला नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना नागपूर शहरात फक्त काँग्रेसच्या सतरंज्या उचलण्यासाठी झालेली नाही. वारंवार डावलल्या जाणार असेल तर आम्हालाही निवडणूक लढण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यावेळी आम्ही आमची ताकद किती हे काँग्रेसला दाखवून देऊ असा इशारा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com