Ravikant Tupkar : क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वाढवले महायुतीचे टेन्शन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिला अल्टीमेटम

Revolutionary Farmers Union News : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचा दावा केला होता.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : रविकांत तुपकर यांनी स्थापन केलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पहिल्याच कार्यकारिणी बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १८ मार्चचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. यानंतर मुंबई येथील अधिवेशनात आंदोलनाचा बॉम्ब टाकण्यात येईल, असा इशारा देऊन त्यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.

महायुती (Mahayuti) सरकारच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचा दावा केला होता. यात शेतकऱ्यांची कर्जमाफीचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Ravikant Tupkar
Shivsena Vs Shivsena : आनंद आश्रमाबाहेर दोन्ही शिवसेना गट आमने सामने

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा शेतकरी चळवळीला जिवंत करण्याचा संकल्प सोडला आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांची पोरं सभागृहात जावी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेता यावे याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Ravikant Tupkar
Shivsena News : उद्धव ठाकरेंचा सातबारा कोरा होणार; आशिष जयस्वालांचा राऊतांना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी खासदार होते. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्यांचे नाव विधान परिषदेसाठी देण्यात आले होते. तेव्हापासूनच संघटनेत खटके उडायला सुरुवात झाली होती. यातच रविकांत तुपकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बुलढाना मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी मोठा दबाव टाकण्यात आला होता.

Ravikant Tupkar
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्यात जोरदार राडा; ठाकरेंचे शिवसैनिक भिडले!

त्यांना स्वाभिमानीने नोटीस बजावून समितीसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. ते त्यांनी धुडकावून लावले. लाखाच्या जवळपास मते घेतल्याने तुपकरांचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आता राजकीय चळवळ उभी केली असल्याचे स्पष्ट होते.

Ravikant Tupkar
Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवस चालणार ? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

ठोकाठोकीचीही तयारी

तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक असावी यासाठी "किसान आर्मी" तयार करणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली आहे. ही आर्मी ठोकाठोकीचे काम करणार आहे. शेतकऱ्यांची सक्तीची वसुली करणारे बँक अधिकारी, शेतकऱ्यांची वीज तोडणारे, शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करणारांना तसेच गुंड, मुजोर नेत्यांना झोडपून काढण्यासाठी किसान आर्मीची टीम गावागावात काम करणार असल्याचाही इशारा तुपकर यांनी दिला आहे.

Ravikant Tupkar
Eknath Shinde : महायुतीमध्ये कुठलेही कोल्ड वॉर नाही; सर्व काही थंडा कूल कूल; उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकावर पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com