Fadnavis on Elvish Yadav : फडणवीसांचं स्पष्ट उत्तर, हिशोब करत बसलो, तर सगळेच नेते अडचणीत येतील

Supported CM Eknath Shinde : पुराव्याअभावी केलेले आरोप लोकांवरच उलटतील
DCM Devendra Fadnavis CM Eknath Shinde & Elvish Yadav
DCM Devendra Fadnavis CM Eknath Shinde & Elvish YadavGoogle
Published on: 
Updated on: 

Reply from Nagpur on the Controversy : प्रसिद्ध यू-ट्यूबर एल्विश यादव हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणेशोत्सवात सहभागी झाला होता. नोएडा पोलिसांनी केलेल्या छापेमारीनंतर सापांची तस्करी, रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका आणि आरोप केले जात आहेत. या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कसा, याबद्दल स्पष्टीकरण दिलंय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे गणेशोत्सव असतो, तेव्हा वेगवेगळ्या सेलिब्रिटी येत असतात. ही सर्वसामान्य बाब आहे. एल्विश यादव याने रिअॅलिटी शो जिंकला होता. अशा अनेक सेलिब्रिटी नेत्यांकडे येऊन जातात. ज्यावेळी एल्विश यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर येऊन गेला तेव्हा त्याच्यावर कुठला आरोप नव्हता. त्यावेळी तो एक सेलिब्रिटी म्हणून आला असेल. आता त्याच्यावर आरोप आहेत, असं म्हणून जर हिशोब करायला लागलो तर महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांना अडचणी होतील. (DCM Devendra Fadnavis Supported CM Eknath Shinde from Nagpur on Elvish Yadav Controversy)

काही लोकांना महाराष्ट्रात आता काही उद्योगच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं ते उठसूठ मुख्यमंत्र्यांवर आरोप लावण्याचे धंदे चालवतात. हे वैफल्यग्रस्त धंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकं करीत आहेत. कोणत्याही पुराव्याअभावी केलेले आरोप आपल्याभोवतीच फिरून परत येतात. त्यामुळं राजकीय लोकांनी विचार करून आरोप करावेत, असा सल्ला वजा सूचनाही फडणवीस यांनी एल्विश यादव प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य करणाऱ्यांना केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ड्रग्स प्रकरणातील धागेदोरे काढणार

राज्यातील ड्रग्स प्रकरणातील धोगेदोरे शोधून काढण्याचे आदेश आपण पोलिस विभागाला दिले आहेत. ललित पाटील प्रकरणात जर पोलिसांचा सहभाग असेल, तर तपासानंतर अशांना सेवेतून बडतर्फ केले जाईल. ड्रग्ससंदर्भात जे कोणी व्यवहार केले असतील, त्यांना त्याची कठोर किंमत मोजावी लागेल. यासंदर्भात कडक कायदे आहेत. त्या कायद्यान्वये योग्य ती कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

राज्यात ड्रग्स विरोधात अभियान सुरू करण्यात आलंय. आता अभियान आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविण्याचीही गरज आहे. यासंदर्भात आपण प्रयत्नशील आहोत. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ड्रग्सच्या मुद्द्यावर केलेल्या आऱोपांनादेखील फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, ड्रग्सच्या संबंधात गुंतलेल्या लोकांवर जेवढे कडक कायदे आहेत, ते सगळे लावण्यात येतील. आपण ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ अभियान सुरू केलंय. प्रत्येक जिल्ह्यात छापे टाकले जात आहेत. पोलिसांनी कोणत्याही गुन्हेगाराचा साथ देणं अपेक्षित नाही. त्यामुळे ड्रग्ससारख्या गंभीर प्रकरणात आरोपी असणाऱ्यांवर तर कारवाई होईलच, परंतु जे पोलिस यात गुंतलेले असतील त्यांना नियम ३११ प्रमाणे कायमचे बडतर्फ केलं जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

(Edited By : Atul Mehere)

DCM Devendra Fadnavis CM Eknath Shinde & Elvish Yadav
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंनी उपोषण थांबवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.