Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचं मोठं स्वप्नंं पूर्ण होणार; नागपूरचा 'हा' प्रकल्प ‘टेकऑफ’ घेणार

Supreme Court On Nagpur Airport : नागपूर विमानतळाच्या पुनर्विकासाचा प्रश्न बराच कालावधीपासून कायदेशीर कचाट्यात अडकला होता. मात्र, शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपुरात मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकासाचे काम न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रदीर्घ काळ रखडले गेले होते.या विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने व्यवस्थापनाबाबत केंद्र शासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दाखल केलेली याचिका शुक्रवारी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं स्वप्नंही पूर्ण होणार आहे.

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नागपूर हा बालेकिल्ला राहिला आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपुरात मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता.पण गेले काही वर्ष हा प्रकल्प रखडला होता.

सर्वोच्च न्यायालयाने जीएमआरविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळल्याने आता नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकासाचे मार्ग मोकळा झाला आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाबाबत केंद्र शासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दाखल केलेली क्युरेटिव्ह पेटिशन याचिका सुरू ठेवण्यायोग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते.यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, न्या.संजीव खन्ना, न्या.जे.के.माहेश्वरी आणि न्या.बी.आर.गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

Devendra Fadnavis
Mumbai University Senate Election : भाजपला ज्याची भीती होती तेच घडलं! ठाकरेंनी मैदान मारलं

देवेंद्र फडणवीस ट्विटमध्ये काय म्हणाले..?

उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर म्हणतात, मला अतिशय आनंद आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नागपुरातील जागतिक दर्जाच्या ब्राऊनफिल्ड विमानतळ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्गो विमानतळ सुद्धा असेल आणि दोन धावपट्ट्या असतील. नागपूरचे हे नवे विमानतळ माझे स्वप्न होते आणि त्यासाठी मी सातत्याने परिश्रम घेतले. आता यामुळे नागपूरचा मिहान प्रकल्प खर्‍या अर्थाने ‘टेकऑफ’ घेणार आहे, असंही फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Rajan Patil : राजन पाटलांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ; सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली हाती...

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाबाबत केंद्र शासन आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दाखल केलेली क्युरेटिव्ह पेटिशन याचिका सुरू ठेवण्यायोग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते.यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, न्या.संजीव खन्ना, न्या.जे.के.माहेश्वरी आणि न्या.बी.आर.गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

नागपूर विमानतळाच्या पुनर्विकासाचा प्रश्न बराच कालावधीपासून कायदेशीर कचाट्यात अडकला होता. मात्र, शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपुरात मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब आणि विमानतळ बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता.

मात्र, त्यानंतर या प्रकल्पाचं काम जीएमआरला मिळाले होते, पण राज्य सरकारकडून जीएमआरला देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले. या निर्णयाविरोधात जीएमआर कंपनी उच्च न्यायालयात गेली. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने 9 मे 2022 रोजी कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू होते. पण आता विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com