Anil Deshmukh Vs Parinay Phuke : फुकेंनी टायमिंग साधलं, देशमुखांना अडचणीत आणलं

Anil Deshmukh illegal investment was timed by Pariney Phuke : माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या कलकत्तामधील कंपन्यांमध्ये बेकायदेशीर गुंतवणूक असल्याचा आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी केला. ही बेकायदेशीर गुंतवणूक बाहेर काढण्याचा इशारा फुके यांनी दिला आहे.
Anil Deshmukh Vs Parinay Phuke
Anil Deshmukh Vs Parinay PhukeSarkarnama
Published on
Updated on

Parinay Phuke News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणारे राज्याचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख हे सचिव वाझे यांच्या आरोपांमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.

भाजपचे आमदार परिणय फुके यांनी देखील टायमिंग साधत अनिल देशमुखांच्या अडचणीत अधिक भर घातली. अनिल देशमुख यांच्या कलकत्ता येथील अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगून ते आपण बाहेर कढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. उद्धव ठाकरे यांच्यासह चार नेत्यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र भरून देण्यास सांगितले होते, असा आरोप काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी केला होता. या आरोपामुळे देवेंद्र फडणवीस चांगलेच अडचणीत आले. देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांना प्रत्युत्तर देताना त्यांचा पेनड्राईव्ह बाहेर काढला होता. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या. पेनड्राईव्ह प्रकरण शांत झाल्यानंतर आता सचिन वाझे यांच्यामुळे देशमुख अडचणीत आले आहे.

Anil Deshmukh Vs Parinay Phuke
Devendra Fadnavis : भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा सुरू असतानाच फडणवीस 'RSS' मुख्यालयात

सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्री असताना स्वीय सहायकाच्या माध्यमातून ते पैसे घेत होते, असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. या आरोपांमुळे पुन्हा एकदा राज्याचे वातावरण ढवळून निघू लागले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षातील नेते एकमेकांसमोर आले आहेत. या आरोपांमध्ये देशमुखांबरोबर जयंत पाटील यांचे नाव आल्याने राष्ट्रवादी पवार पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी पवार पक्ष एकमेकांसमोर आले असतानाच, भाजप आमदार परिणय फुके यांनी टायमिंग साधत देशमुखांना इशारा दिला आहे.

Anil Deshmukh Vs Parinay Phuke
Video Devendra Fadnavis News : महायुती सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; विजबिलाबाबत ऊर्जामंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

परिणय फुके यांनी वाझे गुन्हेगार प्रवृत्तीचे होते, तर त्यांना नोकरीत का घेतले, तेव्हा त्यांची विश्वासहार्ता होती का, अशी विचारणा देशमुखांना केली. फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर काही लोक आपल्याला भेटले. त्यांनी कलकत्ता इथल्या अनेक छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगितले. याची आपण स्वतंत्र एजन्सीकडून माहिती गोळा करीत आहोत. ठोस पुरावे आल्यानंतर देशमुखांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली जाईल, असे त्यांनी सांगितले. वाझे यांनी स्वतःच नार्को चाचणी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातून अनेक घोटाळे बाहेर येऊ शकतात. देशमुखांनी काहीच केले नसले, तर त्यांना घाबारण्याचे कारण काय असेही आमदार फुके यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com