Dhananjay Munde News : राज्याचे कृषिमंत्रिपद असूनही धनूभाऊंना परळीचा मोह सुटेना; मराठवाड्यातील 'ही' महत्त्वाची कार्यालये हलवली

Marathwada Political News : '' आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि युती सरकार सत्तेत आल्यावर मुंडे काहीसे 'बॅकफूट'ला गेले होते. पण...''
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात अजित पवारांसह आमदारांचा एक मोठा गट शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी झाला. यात धनंजय मुंडे यांचादेखील समावेश होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री राहिलेल्या मुंडेंच्या 'महायुती' सरकारमध्ये थेट कृषी खातं पदरात पडलं.

आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि युती सरकार सत्तेत आल्यावर मुंडे काहीसे 'बॅकफूट'ला गेले होते. पण अजित पवारांचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर बीड जिल्ह्याला विशेषत: परळीला पुन्हा धनंजय मुंडेंनी सरकारमधलं आपलं वजन वापरत झुकतं माप देण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Dhananjay Munde News
Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला ; बीड जिल्ह्यातल्या सरपंचाने चौंडीत येऊन केले मुंडन !

कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड जिल्ह्यातही राज्य सरकारचा 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार होता. मात्र, मुंडेंनी तो कार्यक्रम परळीला हलविला आहे. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यामुळे आगामी काळात बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मुंडेंकडे येण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, बीडला होणारा 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम परळीत नेल्यानंतर आता मुंडेंनी सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी, लाल कंधारी या गोवंशाचे संशोधन केंद्र परळीला हलवले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें(Eknath Shinde) च्या अध्यतेखाली रविवारी छत्रपती संभाजीनगरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे केंद्र परळीला हलविण्याच्या सरकारच्या निर्णयामागे मुंडेंचीच फिल्डिंग असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. हा एकप्रकारे मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडकरांना दणकाच दिला आहे. धनंजय मुंडे यांनी राज्याचे कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विकासाचा एकच पॅटर्न अर्थात परळी हे धोरण अवलंबल्याचे बोलले जात आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली असे आठ जिल्हे आहेत. आणि या सर्व जिल्ह्यांत औद्योगिक, कृषी, शैक्षणिक यांसारख्या अनेक क्षेत्रातल्या विकासाची नितांत गरज आहे. त्यातल्या पाठीशी असलेला सदासर्वकाळ पाठी असलेला दुष्काळ, बेभरवशी हवामानाचा दगाफटका, पिकांचे कोसळलेले दर यामुळे आधीच मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

धनंजय मुंडेंच्या रूपाने मराठवाड्याला कृषिमंत्रिपद मिळाल्याने अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कृषिमंत्र्यांनी फक्त परळीचाच विकासाच धोरण न अवलंबिता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील विकासाकडेही लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा सुरू आहे.(Agriculture Minister)

Dhananjay Munde News
Bachchu Kadu News : आक्रमक बच्चू कडुंची सचिन तेंडुलकरसाठी राज्यभर 'भीकपेटी' !

धनंजय मुंडे यांनी याशिवाय कृषी विभागाच्या अनेक योजना बीड जिल्ह्यातल्या थेट परळीला आणि अंबाजोगाईला नेल्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र तसेच लातूर जिल्ह्यातील देवणचे देवणी वंश संशोधन केंद्र परळीला हलविले आहे. यामुळे कृषी विभागाचे सर्वकाही परळीच असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhananjay Munde News
Dhangar Reservation: मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे अ‍ॅक्शन मोडवर; बोलावली तातडीची बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.