
NCP Vs BJP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा अद्याप फैसला व्हायचा आहे. मात्र त्यापूर्वीच महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. गडचिरोलीचे आमदार व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेत एकही जागा मिळणार नाही, असे भाजपला ठणकावून सांगितले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी डमी उमेदवार उभा केला. त्याला ५ कोटी रुपये दिले असा आरोपही त्यांनी जाहीरपणे भाजपवर केला. हे बघता गडचिरोलीत महायुती तुटणार असेच चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून बाबा आत्राम आक्रमक झाले आहेत. २ दिवसांपूवी त्यांनी गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर तोफ डागली होती. ते सहपालकमंत्री आहेत मात्र पालकमंत्र्यांसारखे वागतात. अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. सत्तेत असताना आम्हाला विकासासाठी निधी देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काही अधिकार बहाल केले आहे. मात्र त्याचा ते गैरफायदा घेत आहेत. त्यांचा हस्तक्षेप मर्यादेपेक्षा वाढला असल्याचा आरोप केला होता.
त्यापुढे जाऊन बाबा आत्राम यांनी भाजपलाही अंगावर घेतले. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढली होती. महायुतीचा मी अधिकृत उमेदवार होतो. त्यानंतरही भाजपने आपल्याच पुतण्याला बंडखोरी करायला लावली. सोबतच बंडखोर उमेदवार राजे अंब्ररीशराव आत्रमा यांना पाच कोटी रुपये दिले असा खळबळजनक आरोप केला. आता जिल्हा परिषदेत एकत्र लढू असा प्रस्ताव घेऊन भाजपवाले आले आहेत.
गडचिरोली जिल्हा परिषदेत १९ सर्कल आहेत. त्यातील भाजपला ७ जागा लढायच्या आहेत आणि ते मला १० जागा लढाव्या असा सल्ला देत आहेत. मीच तुम्हाला जागा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने किती लढायच्या याचा मी निर्णय घेईल. तुम्ही कोण होता सांगणारे? मला पाडायला पाच कोटी रुपये दिले होते आता मलाच जागा कसल्या मागता? अशा शब्दात बाबा आत्राम यांनी भाजपला सुनावले.
शिवाय आता जागा वाटपाचा विषय बंद झाला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. बाबा आत्राम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपही धास्तावली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.