एकनाथ शिंदे पहिल्यांदाच, तेही पायी चालत हॉटेल रॅडीसनच्या बाहेर आले, अन् म्हणाले...

शिवसेना जो रोज दावा करीत आहे की, आमच्या संपर्कात आमदार आहेत, तर त्यांनी आमदारांची नावे जाहीर करावी, असे आव्हान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : २१ जून रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षासोबत बंड करून सुरत गाठले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला. तेव्हा दररोज वेगवान घडामोडी घडत आहे. हा बंड सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर काल सोमवारपासून घडामोडींचा वेग वाढला. त्यानंतर आज प्रथमच एकनाथ शिंदे गुवाहाटीतील हॉटेल रॅडीसनच्या बाहेर पायी चालत आले.

हॉटेलच्या बाहेर येताच त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. शिवसेना (Shivsena) जो रोज दावा करीत आहे की, आमच्या संपर्कात आमदार आहेत, तर त्यांनी आमदारांची नावे जाहीर करावी, असे आव्हान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. यानंतर त्यांनी आपल्या गटाची भूमिका मांडली. ते म्हणाले, आमच्या सोबत ५० आमदार (MLA's) आहेत आणि कुणालाही येथे जबरदस्तीने आणलेले नाही. सर्वजण स्वमर्जीने येथे आलेले आहेत आणि आम्ही सर्व एकत्रितपणे हिंदुत्वाच्या मुद्यावर बाहेर पडलो आहोत, असे ते म्हणाले.

मी लवकरच मुंबईत जाणार आहे, पण नेमके केव्हा हे सांगायचे त्यांनी टाळले. याबाबत गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर अधिकृतपणे सांगणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेकडून करण्यात येत असलेले दावे धादांत खोटे आहेत. आमच्यापैकी कुणीही त्यांच्या संपर्कात नाही. येथे जबरदस्ती तर कुणावरही नाही. आम्हा सर्वांना शिवसेनेत डावलले जात होते. आमचे मनोबल खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. मंत्री असो वा आमदार सर्वांची घुसमट होत होती. तीच या बंडाच्या माध्यमातून बाहेर निघाली आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

आदित्य सर्वेसर्वा झाले होते..

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनाच मोठे केले जात होते. निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हा सर्वांना डावलले जात होते. याचा स्फोट कधी ना कधी होणारच होता, तो आता झाला. या सर्व घडामोडींनंतर आम्ही लवकर मुंबईला जाणार आहोत आणि त्याबाबत आमचे प्रवक्ते लवकरच भूमिका मांडणार आहेत. आम्ही पुढची रणनीती आखत आहोत. आमचा निर्णय झाला आहे आणि पुढील भूमिकाही ठरली आहे. येथे स्वार्थाने कुणीही आलेले ही, तर लयास जात असलेले हिंदुत्व आणि बाळासाहेबांची विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी आलेले आहेत, असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
माझा लढा सर्व शिवसैनिकांच्या हितासाठी समर्पित : एकनाथ शिंदे

एक-दोन दिवसांत अविश्‍वास आणणार !

आपण लवकरच मुंबईत जाणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत शिंदे गट महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यपालांना पत्र देण्यात येईल. दाट शक्यता आहे की, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे पत्र राज्यपालांना देतील, असे सूत्र सांगतात.

अमावस्या संपल्यावर प्रक्रिया वेग घेणार !

आज आणि उद्या अमावास्येचा प्रभाव आहे. त्यामुळे अमावस्या संपल्यानंतर राज्यपालांकडे अविश्‍वासाचे पत्र शिंदे गट देईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली. अमावस्या संपल्यानंतर सत्ता स्थापनेला गती मिळेल आणि सुयोग्य शासन महाराष्ट्रावर राज्य करेल, असे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com