Eknath Shinde : आम्ही '50 खोके' घेणारे नाही, '200 खोके' देणारे..

Eknath Shinde : विरोधकांना धडकी भरलेली आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

भंडारा : मागील अनेक दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांकडून खोके सरकार म्हणून डिवचण्यात येत आहे. '५० खोके, एकदम ओके,' या घोषणेने विधिमंडळाचे परिसर विरोधकांनी दणाणून सोडले होते. यावर आता खु्द्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोके या शब्दाचा विशेष उल्लेख करत स्पष्टीकरण दिले आहे. "आम्ही 50 खोके घेणार नाही तर 200 खोके देणारे आहोत," असे शिंदे म्हणाले.

50 खोक्यांच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेनी मिश्किल टिप्पणी केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काम करणार सरकार महाराष्ट्राने पाहिले. अडिच तीन महिन्यात सरकार एवढं काम करू शकते. तर पुढच्या दोन-सव्वादोन वर्षात सरकार हे सरकार काय करेल, यामुळे विरोधकांना धडकी भरलेली आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे हे 50 खोके घेणार नाही, तर 200 खोके देणारे आहेत. आणि ते विकासासाठी देणारे आहेत. आज सकाळपासून 200 कोटी पेक्षा जास्त कामांची भूमिपूजन झाले, असे शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Jitendra Awhad : "राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी.." ; जामीनानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया!

दरम्यान, सरकारवर 'खोके सरकार' म्हणून विरोधकांकडून सरकारला सतत डिवचण्यात येते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सतत खोके सरकार म्हणून शिंदे फडणवीस सरकारवर टीका करताना दिसून येतात. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही आज खोक्यावरून सरकारला डिवचले होत. ज्यांनी ज्यांनी खोके घेतले असतील, त्यांनी ते अगदी उघडपणे सांगावे, असे खोचकपणे त्यांनी शिंदे गटावर वार केला.

Eknath Shinde
केंद्रीय मंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद अन्‌ पैसेही दिले...!

दरम्यान, भंडारा शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांनी केले. भंडारा येथील नाशिक नगर मैत्रेय बुद्ध विहार येथे ई लायब्ररीचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच नगर परिषदेमार्फत गांधी विद्यालय येथे अभ्यासिकेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि ३.५० कोटींच्या कामांना मान्यताही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार डॉ.परिणय फुके तसेच भंडारा जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com