Upendra Shende News : माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रिपब्लिकन पक्षाचे ते नेते होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत काम केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या चळवळीत उपेंद्र शेंडे यांची महत्त्वाची भूमिका होती. उत्तर नागपूर मतदारसंघातून 1990 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते.
उपेंद्र शेंडे यांच्या लढ्याने चळवळीचे स्वरुप घेतले आणि ही चळवळ चालवण्यात आणि नामांतराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशा शब्दांत आमदार नितीन राऊत यांनी त्यांनी श्रद्धांजला अर्पण केली.
1993 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठ नामांतर लढ्यात नामांतरणासाठी उपेंद्र शेंडे यांनी मुंबई येथे आमरण उपोषण केले होते.
माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांचा मोठा सहभाग राहिला. चळवळीतील नेता ही ओळख त्यांनी कायम जपली. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.