Kolhapur Politics : मुश्रीफ-आबिटकरांच्या स्वागताकडे भाजपची पाठ; आता चंद्रकांतदादांच्या 'एन्ट्री'ला राष्ट्रवादी,शिवसेना जाणार..?

Mahayuti Politics : कोल्हापूर भाजपकडून शहरात चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या स्वागतादरम्यान भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. आता राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार का? हे देखील पहावे लागणार आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील दोन मंत्र्यांचे जल्लोषी स्वागत होताच आता भाजपकडून नव्या मंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. कोल्हापूरचे पण कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते कोल्हापुरात येत आहेत. कोल्हापूर भाजपच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. रविवारी ते सकाळी सहा वाजता कोल्हापुरात येणार असून उद्या दिवसभर ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

भाजपच्या वतीने कोल्हापूर रेल्वेस्थानक येथे सकाळी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी सहा ते आठ या वेळेत नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात येणार असून या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील हे सकाळी सव्वा सात वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावर येणार असून ते संभाजीनगर येथील घरी जाणार आहेत. सायंकाळी ते भाजप कार्यालयात येणार आहेत. सोमवारी आठ वाजता ते वाडी रत्नागिरी येथील जोतिबा दर्शनासाठी जाणार आहेत. तर साडेनऊ वाजता करवीर निवासाने श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन त्यांच्या मूळ गावी खानापूर इकडे रवाना होणार आहेत. तर सायंकाळी चार नंतर ते गोव्याकडे रवाना होणार आहेत.

Kolhapur Politics
Manoj Jarange Video : '...तर दांडकं हातात घेऊ', मुख्यमंत्री फडणवीसांना मनोज जरांगेचा इशारा

दरम्यान, कोल्हापूर भाजपकडून शहरात चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushsrif) आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या स्वागतादरम्यान भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. आता राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार का? हे देखील पहावे लागणार आहे.

कारण मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून मंत्री मुश्रीफ आणि मंत्री अबिट कर यांचे जंगी स्वागत मिरवणूक काढण्यात आली. मात्र या मिरवणुकीकडे महायुतीतील भाजपचे काही प्रमुख पदाधिकारी आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरात असून देखील पाठ फिरवली होती. क्षीरसागर यांनी आपल्याला मंत्री पद मिळाले नसल्याने आपण नाराज असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

मात्र, या स्वागत मिरवणुकीला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र महायुतीतील भाजप प्रमुख पक्ष असलेल्या एकाही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या स्वागत समारंभाला उपस्थिती लावली नाही. त्यामुळे या निमित्ताने जिल्ह्यातील महायुतीतील पदाधिकाऱ्यांची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com