Barshi Takli Water Issue : 'प्रिय हरिशभाऊ, तुम्ही कोणत्या धर्माचे पालन केले, बार्शीटाकळीतही अनेक जरांगे पाटील’; भाजप आमदाराविरोधात जनता आक्रमक

MLA Harish Pimple News : बार्शीटाकळीत मला कमी मते मिळाली, हे आपले रडगाणे सारखे असते, यात हिंदू-मुस्लिम व बौद्ध बांधवांचा दोष काय?
MLA Harish Pimple
MLA Harish PimpleSarkarnama

Akola News : बार्शीटाकळी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून मंजूर झालेली पाणी योजना रद्द करून केंद्राची अमृत २.० ही योजना मंजूर करावी, असे पत्र मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिले आहे. ते पत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्याने आमदार पिंपळेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. ‘आपण आमचे लोकप्रतिनिधी असूनही आमच्या हक्काचे पाणी हिरावून घेऊन कोणत्या धर्माचे पालन केले आहे? ते जरा बार्शीटाकळीकरांना सांगा,’ असे आव्हान पिंपळेंना खुल्या पत्राद्वारे केले आहे. तसेच, बार्शीटाकळीत अनेक जरांगे पाटील आहेत, असा इशाराही दिला आहे. (Feelings of anger in Barshi Takli over MLA Harish Pimple's letter)

दरम्यान, या संदर्भात आमदार हरीश पिंपळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. बार्शीटाकळी येथील काही सर्वधर्मीय युवकांनी पत्रकार परिषद घेऊन जी योजना मंजूर झाली, तीच लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

MLA Harish Pimple
CM Ask Raut ? : ‘राऊत आले नाहीत का,?’ ; मुख्यमंत्र्यांचा भर पत्रकार परिषदेत सवाल

पत्रात म्हटले आहे की, प्रिय हरीशभाऊ पिंपळे बार्शीटाकळीकरांचा मनःपूर्वक नमस्कार. पण आमचे लोकप्रतिनिधी असताना आमच्या हक्काचे पाणी हिरावून घेऊन कोणत्या धर्माचे नेमके पालन केले आहे? ते जरा बार्शीटाकळीकरांना सांगा. बार्शीटाकळीत मला कमी मते मिळाली, हे आपले रडगाणे सारखे असते, यात हिंदू-मुस्लिम व बौद्ध बांधवांचा दोष काय? लोकशाहीमध्ये कोणाला मतदान करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला दिला आहे.

MLA Harish Pimple
Fadnavis On Sunil Kendrekar Report : सुनील केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता; पण... ; फडणवीस अखेर बोलले

आम्ही आपल्याला मतं दिली नसतील, असे गृहीत धरूया. मग त्याचा बदला असा घेणार आहात का? दुश्मन जरी असला तरी त्याला पाणी पाजले पाहिजे, ही आपल्या धर्माची शिकवण आहे. भाजप पक्षाची पण तीच शिकवण आहे. केवळ आपल्या अहंकारापोटी आज आपण अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली व आपल्याच सरकारने मार्गी लावलेली बार्शीटाकळी पाणीपुरवठा योजना थांबवली आणि पत्रामध्ये अमृत योजनेतून (ज्या योजनेत एक रुपयासुद्धा नाही) ही योजना मंजूर करावी, असे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंतीचे पत्र लिहून उद्दामपणे वागलात, असा आरोपही निनावी पत्रात करण्यात आलेला आहे.

MLA Harish Pimple
Jankar Increase tension to Kolhe-Adhalrao : महादेव जानकर वाढविणार डॉ. कोल्हे-आढळरावांचे टेन्शन...

पत्रात म्हटले आहे की, पाणी योजनेचे श्रेय आपल्याला घ्यायचे असेल तर आपणच घ्या. आपलेच कॉन्ट्रॅक्टर ठेवा. आपणच कमिशन घ्या. आपल्याच पक्षाची बॅनरबाजी करा. आपण स्वतः उद्‌घाटन करा. मात्र, गोरगरिबांच्या हक्काच्या पाण्यासोबत राजकारण करू नका... तुम्हाला हा जर श्राप लागला तर भविष्यात तोंड दाखवायलाही जागा मतदार ठेवणार नाहीत. तुमची पुढची पिढी सुखाने नांदणार का? कृपया पाण्यासाठी राजकारण करू नका.

आपल्या हेकेखोर स्वभावामुळे व आपण दिलेल्या त्रासामुळे आज कर्तव्यदक्ष सीईओ यांनीसुद्धा बार्शीटाकळी नगरपरिषदेचा चार्ज सोडला आहे. आपल्या या कृत्याबद्दल अत्यंत खेद वाटतो. बार्शीटाकळीच्या लोकांच्या तोंडचे पाणी पळविल्याप्रकरणी आपला निषेध करावा, तितका कमीच आहे. आता हे आंदोलन आणखी तीव्र होईल... बार्शीटाकळीत अनेक जरांगे पाटील आहेत, असाही इशारा देण्यात आलेला आहे.

MLA Harish Pimple
MLA Disqualification Case : शिंदे गट आमदार अपात्रतेबाबत पटोलेंची भविष्यवाणी; जरांगेंचे उपोषण सोडविण्यास फडणवीस ‘या’ कारणामुळे गेले नाहीत

दरम्यान, आमदार हरीश पिंपळे यांच्या या पत्रावरून सध्या बार्शीटाकळी येथील काही सर्वधर्मीय युवकांनी पत्रकार परिषद घेऊन जी योजना मंजूर झाली, तीच लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे; अन्यथा सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

MLA Harish Pimple
Barshi Takli Water Supply Scheme : भाजप आमदार हरीश पिंपळेंचे पत्र पळविणार बार्शीटाकळीकरांच्या तोंडचे पाणी; शहरात संताप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com