Jankar Increase tension to Kolhe-Adhalrao : महादेव जानकर वाढविणार डॉ. कोल्हे-आढळरावांचे टेन्शन...

RSP News : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Manchar News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढविणार असे दिसते आहे. कारण, राष्ट्रीय समाज पक्ष हा बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जानकर यांनी आज केली आहे. त्यामुळे मतविभागणीचा फटका कोणला बसतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Mahadev Jankar will increase the tension between Kolhe and Adhalrao patil)

माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाने काढलेल्या रथयात्रेचे शनिवारी (ता. १६ सप्टेंबर) आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतचा रासपचा निर्णय जाहीर केला.

Mahadev Jankar
CM Ask Raut ? : ‘राऊत आले नाहीत का,?’ ; मुख्यमंत्र्यांचा भर पत्रकार परिषदेत सवाल

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यात बारामती आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. मराठा, मुस्लीम व धनगर या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सत्तेत आल्यानंतर दोनच दिवसांत मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जानकर यांनी या वेळी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली.

जानकर म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप कधीही आरक्षण देणार नाहीत. कारण, या पक्षांनी जनतेला गेली अनेक वर्षे झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. मागील निवडणुकीत आम्ही भाजपबरोबर होतो. पण त्यांना आता छोट्या पक्षाची गरज वाटत नाही, त्यामुळे आम्ही विविध राज्यात रथयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. गावोगावी आम्हाला लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.

Mahadev Jankar
Fadnavis On Sunil Kendrekar Report : सुनील केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता; पण... ; फडणवीस अखेर बोलले

इंडिया आघाडी अथवा भाजपकडून आम्हाला निमंत्रण आल्यास युतीबाबत विचार करण्यात येईल अन्यथा आम्ही स्वबळाचा मार्ग निवडला आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन रासपची पक्षसंघटना मजबूत करण्याचे काम करण्यात येत आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राज्यात व देशात सत्ता स्थापन होऊ शकणार नाही, असे संख्याबळ आम्हाला तयार करायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Mahadev Jankar
Sunil Shelke In Trouble : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने केली आमदार सुनील शेळकेंची अडचण

या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सुशील कुमार, ज्ञानेश्वर सलगर, युवक अध्यक्ष अजित पाटील, समन्वयक सचिन गुरव, अॅड संजय माने, विनायक रुपनवर, सचिन लोंढे, भाऊसाहेब घोडे, योगेश धरम उपस्थित होते.

Mahadev Jankar
Bacchu Kadu Vs Ravi Rana : बच्चू कडू मंत्रिपदासाठी सरकारला ब्लॅकमेल करतात; रवी राणांचा पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com