Nitin Deshmukh Breaking News : ठाकरे गटाचे फायरबॅंड नेते नितीन देशमुख पोलिसांच्या ताब्यात,नागपुरात जलसंघर्ष यात्रा रोखली

Political News :''मी मरेन पण माघार घेणार नाही...''
Nitin Deshmukh Breaking News
Nitin Deshmukh Breaking NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी ६९ खेड्यांचा पाणीप्रश्न घेऊन जलसंघर्ष यात्रा पदयात्रा सुरु केली आहे. अकोला, अमरावती आणि त्यानंतर नागपूरच्या सीमेवर ही पदयात्रा अखेर गुरुवारी (दि.२१) दाखल झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा तिथेच रोखल्याचं समोर आलं आहे. तसेच नागपूर पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं आहे.

आमदार नितीन देशमुख यांच्याकडून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी अकोला ते नागपूर जलसंघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही यात्रा काढण्यापूर्वी देशमुख यांनी परवानगी घेतली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

Nitin Deshmukh Breaking News
Sanjay Gaikwad News: एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून भाजपची कोंडी; म्हणाले,''आमच्याकडे गुजरातची...''

नितीन देशमुख काय म्हणाले?

नागपुरात पोलिसांनी जलसंघर्ष यात्रा अडवल्यानंतर नितीन देशमुख यांनी नागपूर पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे.पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार नाही. मी मरेन पण माघार घेणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अकोल्यातही गुन्हा दाखल...

मतदारसंघातील पाणी प्रश्नावरुन आमदार नितीन देशमुखां(Nitin Deshmukh)ची अकोला ते नागपूर पदयात्रा 10 एप्रिलपासून सुरु झाली आहे. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरापासून ही यात्रा सुरु झाली असून ती अमरावती जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर मात्र,या पदयात्रेसाठी देशमुखांनी प्रशासनाची परवानगी मागितली नव्हती. तसेच जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश धुडकावल्या प्रकरणी आमदार देशमुख यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nitin Deshmukh Breaking News
Karnataka Election : भाजपचे नेते येदियुरप्पांचा नातू JDS कडून रिंगणात ; बारा उमेदवार बदलले..

महाराष्ट्रात जणू मोगलाई...; संजय राऊतांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नितीन देशमुखांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर टि्वट केलं आहे. राऊत म्हणाले, पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुख यांना अटक झाली. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या.महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली सरकार जनतेलाच घाबरु लागले असं टि्वट देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केलं आहे.

...यात्रा फडणवीसांच्या निवासस्थानी धडकणार!

आमदार नितीन देशमुख यांनी ६९ खेड्यांचा पाणीप्रश्न घेऊन ही पदयात्रा सुरु केली आहे. अकोला, अमरावती आणि त्यानंतर नागपुरात ही पदयात्रा जात आहे. १० एप्रिलपासून यात्रेला सुरुवात झाली. आज ही अमरावती जिल्ह्यात पोहोचली आहे. २१ एप्रिल रोजी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. ६९ गावांतील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारं पाणी प्यावं लागतंय. या पाण्यात क्षाराचं प्रमाण अति असल्याने अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय असा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com