Chandrapur : अख्ख्या गावाने केली पोलिस अधिकाऱ्यावर पुष्पवृष्टी, कारण...

Police Department : निवडणुकीमुळे बदली झाल्यानंतर दिला असाही सपत्नीक निरोप...
Saoli PS API Ashish Borkar
Saoli PS API Ashish BorkarSarkarnama
Published on
Updated on

Saoli City : प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन फारसा चांगला नसतो. त्यातही पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्याबाबतीत तर कितीही केले तरी नाराजी असतेच. परंतु अख्ख्या गावाने एकवटत एका ठाणेदारावर सपत्नीक पुष्पवृष्टी करीत त्याला साश्रूनयनांनी निरोप दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे हा आगळावेळा निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे. त्यानुसार चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. परदेशी यांनी एकूण 65 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. दोन पोलिस निरीक्षक, 28 सहायक पोलिस निरीक्षक आणि 35 पोलिस उपनिरीक्षकांचा यात समावेश आहे. निवडणुकीपूर्वी हे मोठे फेरबदल करण्यात आलेत.

Saoli PS API Ashish Borkar
Chandrapur Congress : शंतनू धोटेंच्या उमेदवारी अर्जाचा अर्थ नेमका काय?

पोलिस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशांनंतर सावलीचे ठाणेदार तथा सहायक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांचीही बदली करण्यात आली. बोरकर गेल्या दोन वर्षांपासून सावली पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी कर्तव्याचे पालन करीत ‘पब्लिक पोलिसिंग’वर भर दिला. सामाजिक भान ठेवत त्यांनी अनेक उपक्रमही राबविले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाईला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांना मदतही केली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवताना त्यांनी गुन्हेगारांवरही वचक निर्माण केला. त्यामुळे अल्पावधीतच बोरकर सावलीत ‘पब्लिक फिगर’ ठरले. त्यांच्या बदलीची माहिती मिळताच सावली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चर्चा सुरू झाली. गावांमधील नागरिकांनी एकत्र येत आशिष बोरकर यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन केले. यावेळी बोरकर यांच्यावर सपत्नीक पुष्पवृष्टी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वीही अनेक सत्कार...

आशिष बोरकर यांच्याप्रमाणे विदर्भात अनेक अधिकाऱ्यांचे लोकांनी अशाप्रकारे कौतुक केल्याचे प्रसंग यापूर्वीही घडले आहेत. राज्य सरकारमध्ये सध्या सचिवपदावर काम करणारे हर्षदीप कांबळे अकोला येथे सहायक जिल्हाधिकारी असताना त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. जिल्हाधिकारी असताना एकनाथ डवले यांची अकोल्यातून बदली झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती, नितीन लोहार (पवार) पोलिस उपअधीक्षक असताना त्यांची बदली झाल्यानंतरही लोकांनी असाच निरोप त्यांनाही दिला होता. तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर ऐन कोविड लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या नागपूर येथे ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक असलेले राजेश खवले हे बुलढाणा येथे उपविभागीय अधिकारी होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ते मोफत मार्गदर्शन करतात. त्यांची बदली झाल्यानंतरही तरुण अक्षरश: रडले होते. अकोल्याचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हेदेखील ‘पब्लिक फिगर’ ठरलेले अधिकारी आहेत. त्यामुळे अधिकारी लोकाभिमुख असले तर त्यांना लोक डोक्यावर उचलून धरतात, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Saoli PS API Ashish Borkar
Chandrapur APMC : उपसभापतिपदासाठी जोरदार ‘फिल्डिंग,’ पिंपळकर-फरकडे आमने-सामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com