Medical Collage : श्रेयवादातून आजी-माजी आमदार आमने-सामने

Gopaldas Agrawal : महाविद्यालयासाठी नाना पटोलेंचे योगदान शून्य
Gondia Medical College
Gondia Medical CollegeSarkarnama
Published on
Updated on

Gondia Politics News : गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली. यात येणाऱ्या सर्व अडचणी आपणच मार्गी लावल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला होता. मात्र, मेडिकल कॉलेजच्या उभारणीत नाना पटोले यांचे योगदान शून्य असल्याचा पलटवार भाजपचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे.

अग्रवाल म्हणाले की, पटोले यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने रविवारी (ता. 11) होत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होत हे भूमिपूजन होणार आहे. अशात गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयावरून आजी-माजी आमदार समोरासमोर आले आहेत.

Gondia Medical College
Bhandara-Gondia Politics : पटोले, डाॅ. फुके, पटेलांचा हल्ली मुक्काम जिल्ह्यातच !

गोपाल अग्रवाल म्हणाले की, 2009 मधील निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी निवडून आल्यास गोंदिया येथे वैद्यकीय महाविद्यालय आणणार असे सांगितले होते. निवडून आल्यानंतर आपण यासाठी पाठपुरावा केला. विधानसभेत आवाज बुलंद केला. त्यानंतर राज्य सरकारने डिसेंबर 2012 मध्ये गोंदिया येथे मेडिकल कॉलेजची घोषणा केली.

मेडिकल कॉलेजसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा कुडवा परिसरात जागा निश्चित करून त्यातील वन कायद्याची अडचण दूर केली. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. यातील बऱ्याच अडचणी दूर करण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल यांची वेळावेळी मदत झाल्याचे गोपाल अग्रवाल यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनीसुद्धा मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी सहकार्य केले; पण यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे कुठलेच योगदान किंवा सहकार्य मिळाले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाना पटोलेंनी न घेतलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये, असा टोलासुद्धा अग्रवाल यांनी लागावला. आपण 15 वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. कुडवा येथील जवळपास 15 हेक्टर जमिनीवर मेडिकल कॉलेजची प्रशस्त इमारत उभी राहणार आहे. यासाठीची सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मेडिकल कॉलेजच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी सांगितले. मेडिकल कॉलेजच्या श्रेयावरून राजकीय नेत्यांत वाद असला तरी मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे गोंदियाकर मात्र आनंदी आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Gondia Medical College
Gondia Hawkers Zone : मतांच्या राजकारणात अडकले गोंदियाचे 'हॉकर्स झोन'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com