Dhangar Reservation News
Dhangar Reservation NewsSarkarnama

Dhangar Reservation News : आज चार मेंढ्या आणल्या उद्या हजारो मेंढ्या येतील; धनगर समाज आक्रमक

Dhangar Andolan : अनुसूचित जमातीत सामाविष्ट करण्यासाठी धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.
Published on

Yavatmal News : अनुसूचित जमातीत सामाविष्ट करण्यासाठी धनगर समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून चार मेंढ्या प्रातिनिधिक स्वरूपात आणून येथील आझाद मैदान परिसरात आमरण उपोषणाला सुरुवात केली. या वेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात चारच मेंढ्या आणल्या. उद्या हजारो मेंढ्या आंदोलनात आणण्याचा इशारा दिला. नव्हेतर विद्यमान एका उपमुख्यमंत्र्यांनी दहा वर्षांपूर्वी आरक्षणाचा शब्द दिला होता. तो अद्यापही पाळला नसल्याचा आरोप करीत रोष व्यक्त केला.

देशाला स्वातंत्र्य होऊन अनेक वर्षे उलटली. मात्र, आजही धनगर (Dhangar) समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आला नाही. परिणामी या सर्वच क्षेत्रात त्यांचा वाटा अगदी नगण्य आहे. परिणामी त्यांचे जीवनमान उंचावले नाही. त्यामुळे अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून शासनाच्या (State Government) सोयी सवलतींचा लाभ देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी गेल्या अनेक वर्षांची धनगर समाजाची मागणी आहे.

Dhangar Reservation News
Wadettiwar on BJP : ‘जागर’ नव्हे बहुजनांची माथी भडकवण्यासाठी भाजपची ‘गाजर’ यात्रा, वडेट्टीवार कडाडले !

निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्ष आश्वासनांची खैरात वाटत सुटतो. सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना या आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळेच आता आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे. त्यातूनच राज्यात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून आंदोलने केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील धनगर समाजही कमालीचा आक्रमक झाला आहे.

त्यांनी आज येथील आझाद मैदान परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे आमरण उपोषणाला सुरुवात केली. या वेळी चार मेंढ्या प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलनात सहभागी करून घेण्यात आल्या होत्या. या वेळी बोलताना आंदोलनकर्त्यांनी आज चारच मेंढ्या आंदोलनात आहेत. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास हजारो मेंढ्या आंदोलनस्थळी आणण्यात येतील, असा इशारा दिला.

शिवाय २०१४ मध्ये आजच्या एका विद्यमान उपमुख्यमंत्र्याने बारामतीत (Baramati) झालेल्या सभेत आमच्या पक्षाला सत्तेत आणा, पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असा शब्दच नव्हेतर लेखी आश्वासन दिले होते. मात्र, आज दहा वर्षे उलटत असताना शब्द पाळल्या गेला नाही, असा आरोप करीत रोषही व्यक्त केला.

बाबासाहेबांकडून राज्यघटनेतही उल्लेख

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना सर्वांनाच न्याय दिला. त्यावेळी सर्व समाजाचा विकसित आणि मागासलेपणा लक्षात घेऊन त्यांनी अविकसित घटकांना आरक्षणाचा मार्ग निवडीत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून अविकसित धनगर समाजाला घटनेत ३६ व्या क्रमांकावर अनुसूचित जमातीत स्थान देण्याची नोंद करून ठेवली. मात्र, त्याचीही दखल आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी घेतली नसल्याची खंतही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

Edited by : Amol Jaybhaye

Dhangar Reservation News
Rohit Patil News: टेंभूप्रश्नी उपोषणादरम्यान रोहित पाटलांची प्रकृती बिघडली; डॉक्टरांचं पथक दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com