Fadnavis Drim steel City : गडचिरोली 'स्टील सिटी' होणार! पण 'या' लोकांच्या पोटात दुखतंय? जयस्वालांचा विरोधकांवर निशाणा

Ashish Jaiswal On opposition Over Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील विकास प्रकल्प आणि लोह खाणीच्या विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जात आहे. आदिवासींच्या जमिनी बळकावून त्यांना बेघर करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
Shivsena MLA Ashish Jaiswal
Shivsena MLA Ashish Jaiswalsarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमीचा सारांश :

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचा प्रस्ताव आणला, ज्यात लॉयड कंपनीने ₹४००० कोटींची गुंतवणूक केली आहे.

  2. विरोधकांनी स्थानिक समस्या दुर्लक्षित झाल्या, रोजगाराची हमी ना मिळणे, आणि जमिनींचे अधिग्रहण यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  3. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आरोप केला की विरोधक ‘विकासाला विरोध’ करत आहेत आणि हे राजकीय कारणांनी करण्यात येत आहे.

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टील सिटी करण्याचा संकल्प केला आहे. अनेक मोठे उद्योग येथे येऊ घातले आहेत. पण फक्त विरोधाला विरोध म्हणून येथे विरोधक विकासालाच विरोध करत असल्याची टीका गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी विरोधकांवर केली आहे.

जयस्वाल यांनी विरोधकांवर निशाना साधताना, गडचिरोली जिल्हा सध्या विकासाच्या दिशेने निघाला आहे. येथे लॉयड कंपनीने सुमारे चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण ही बाब विरोधकांना खटकत आहे. टीका करून विकासाला विरोध केला जात असल्याचा दावाही सांगून जयस्वाल यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Shivsena MLA Ashish Jaiswal
Ashish Jaiswal News : ...म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीनं एकत्रित लढवाव्यात; शिंदेंच्या मंत्र्यांनी सांगितलं कारण

विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील विकास प्रकल्प आणि लोह खाणीच्या विरोधात काँग्रेसतर्फे आंदोलन केले जात आहे. आदिवासींच्या जमिनी बळकावून त्यांना बेघर करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. मंगळवारी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्टील प्लाँट, 100 खाटांचे रुग्णालय, सीबीएई शाळेचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमात आशिष जयस्वाल यांनी गडचिरोली जिल्हा आणि येथील आदिवासी समाजाची होत असलेल्या प्रगतीमुळे काही लोकांच्या पोटात दुखू लागल्याचे सांगितले. त्यामुळे येथील गोरगरीब लोकांना भ्रमीत करण्याचे काम काही लोक करत आहेत. ज्यांना गडचिरोली जिल्ह्याचा विकास नको आहेत असे लोक यात सामील झाले आहेत. ज्यांना लोकांना समजावून सांगता येत नाही आता तेच त्यांना भ्रमीत करत आहेत असा आरोप विरोधकांवर जयस्वाल यांनी केला.

तसेच जयस्वाल यांनी, तुम्ही गरीबच राहाल का? असा सवालही गडचिरोलीच्या नागरिकांना केला. गडचिरोली जिल्हा विकसित झाला पाहिजे. हाच संकल्प घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. या जिल्ह्याला स्टील सिटी करण्याचा त्यांचा मानस आहे. आज चार हजार कोटींची येथे गुंतवणूक आली आहे.

'ये तो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है', असेही जयस्वाल यांनी सांगितले. मी फक्त मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून येतो. येथील विकासाचे प्रस्ताव घेऊन मंत्रालयात जातो. गडचिरोली जिल्ह्याचा विकासाचा एकही प्रस्ताव थांबवायचा नाही असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना देऊन ठेवले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळते असेही जयस्वाल यांनी सांगितले.

Shivsena MLA Ashish Jaiswal
Ashish Jaiswal : खासदार देशमुखांचे फेक नॅरेटिव्ह, आशिष जयस्वालांनी मागितले पुरावे

सतत विचारले जाणारे प्रश्न :

प्रश्न १: गडचिरोलीत स्टील सिटी योजनेचा मूळ हेतू काय?
उत्तर: या योजनेमागील मुख्य हेतू म्हणजे रोजगार निर्मिती, नक्सलवादाचा मुकाबला, सामाजिक व आर्थिक विकासाला गती देणे.

प्रश्न २: स्थानिकांमध्ये या प्रकल्पावर का नाराजी?
उत्तर: काही स्थानिकांनी आरोप केला आहे की कृषिपूर्ण जमीन अधिग्रहित होत आहे, रोजगार हमी नाही, आणि मूलभूत सोयी (रस्ते, वीज) अद्याप अपुरे आहेत.

प्रश्न ३: पक्षिय राजकारणात ही वाद का भडकली आहे?
उत्तर: काँग्रेसने या विकास प्रकल्पावर लक्ष केंद्रित केला आहे आणि असा आरोप लावला आहे की सरकार स्थानिक गरजा दुर्लक्षित करून मोठ्या उद्योगांना वाव देत आहे, तर भाजपने विकासाला अडथळा आणणाऱ्यांवर टीका केली आहे.

प्रश्न ४: पुढील पावले काय असू शकतात?
उत्तर: सरकार स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी अधिक बैठक, जमीन अधिग्रहणात पारदर्शकता आणि रोजगाराच्या अटींचा खुलासा करण्याचा विचार करेल, तसेच विरोधकांशी संवाद साधू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com