Gadkari : गडकरी म्हणाले, मै तो चला जिधर चले रस्ता; मुझे क्या फिकर कहा है मंजिल...

विविध प्रकारचे राष्ट्रनिर्माणाचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून आपण सर्व जण कार्य करीत आहात, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : भारत विकास परिषदेच्या नावात भारत आहे आणि विकासही आहे. त्यामुळेच आपण आपल्या देशाला सुखी, समृद्ध आणि संपन्न करण्याच्या प्रयत्नांत आहोत. आपली मातृभूमी भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झाली पाहिजे. आपण जगातील महाशक्ती बनलो पाहिजे, ही आपल्या सर्वांची भावना आहे. त्यामुळे विविध प्रकारचे राष्ट्रनिर्माणाचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी भारत (India) विकास परिषदेच्या माध्यमातून आपण सर्व जण कार्य करीत आहात, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

येथील (Nagpur) सुरेश भट सभागृहात भारत विकास परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष विजेंद्र सिंह, राष्ट्रीय महामंत्री श्‍याम शर्मा, संघटन मंत्री सुरेश जैन, सुधीर पाठक आणि चंद्रशेखर होते. यावेळी गडकरी म्हणाले, १९४७ मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. दरम्यानच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये एक मोठा वाद सुरू होता, तो म्हणजे आधी स्वराज्य पाहिजे की, आधी विकास पाहिजे. स्वराज्य आणि सुराज्य या दोहोंसाठी आधी समाजात परिवर्तन झाले पाहिजे. आपल्याला समाज सुधरवला पाहिजे, हे आगरकरांचे मत होते. पण इंग्रजांनी आपल्याला गुलाम करून ठेवले होते. या गुलामीतून मुक्त झाल्याशिवाय आपण समाजाचा विकास करू नाही शकणार, हे टिळकांचे मत होते आणि त्यांच्या मताला लोकांचे समर्थन होते.

१९४७ आपल्याला स्वतंत्रता मिळाली आणि आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. या ७५ वर्षांत आपण खूप काही शिकलो. ४७ पूर्वीचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन आपण स्वराज्याची स्थापण्यासाठी संघर्ष करीत आहो. सुराज्याचा उल्लेख गांधीजी रामराज्याच्या रूपात करीत होते. नागपुरात १९३२ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. त्यांच्या उद्देश होता की, देशात व्यापाऱ्यांनी गुलाम बनवले होते. याचे कारण काय, हे शोधले. समाजाला जागवावे लागेल त्यानंतर बलशाली राष्ट्र बनवावे लागेल. याच भावनेतून त्यांनी संघाची स्थापना केली.

Nitin Gadkari
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले नितीन गडकरी यांचे आभार

हिंदी सिनेमातील एक गाणे आहे, ‘मै तो चला जिधर चले रस्ता, मुझे क्या फिकर कहा है मंजील...’ या प्रमाणे आपला प्रवास नाही. कारण आपले उद्दिष्ट्य निश्‍चित आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कसे काम करायचे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. सामाजिक जबाबदारीसोबत आपण काम आपण सर्व क्षेत्रांत काम करीत आहोत. तरीही आपण उद्दिष्टापासून आपण दूर आहोत, त्यामुळे आपल्याला कामाची गती वाढवावी लागेल. वेगवान आर्थिक विकासात आपला आपला पाचवा क्रमांक लागतो. सामाजिक समता आणि आर्थिक समता समाजात प्रस्थापित झाली पाहिजे, असे गडकरींनी सांगितले. आपल्या देशात १२४ जिल्हे सामाजिक, आर्थिक विकासात मागासलेले आहेत. तेथे अजून भरपूर काम करण्याची गरज असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com