

Dhantoli police team left for Belgaon : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल करणाऱ्या जयेश पुजारीचे माईंड वॉश जहाल दहशतवादी अफसर पाशा याने केले होते. धमकी देण्यासाठीही पाशानेच पुजारीला प्रवृत्त केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला आणण्यासाठी नागपूरच्या धंतोली पोलिसांचे पथक बेळगावला रवाना झाले आहे. (Jayesh Pujari was mind washed by terrorist Afsar Pasha)
लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याने जयेश पुजारीला भडकवले होते. अफसर पाशा बेळगाव तुरुंगात असून तुरुंगात पाशाचे जयेश पुजारीसोबत संबंध आले. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे कॉल करीत खंडणीची मागणी करण्यासाठी जयेश पुजारी ऊर्फ कांताला प्रवृत्त करणारा लष्कर-ए-तोयबा आणि पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडियाचा माजी सचिव असलेला अफसर पाशा ऊर्फ बशीरुद्दीन नूर मोहम्मद (वय ४२, रा.चिकम्मा बलापूरा, कर्नाटक) याला लवकरच नागपुरात आणले जाणार आहे.
नागपुरात आणण्यासाठी धंतोली पथक बेळगावला रवाना झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयेशने केलेल्या खुलाशाची तपासणी केल्यावर धंतोली पोलिसांनी त्याच्यावर ‘युएपीए’ ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. जयेश गेल्या दहा वर्षांपासून बेळगाव येथील कारागृहात आहे. या कारागृहात त्यांची सर्वप्रथम ‘डी’ गॅंगशी संबंधित असलेल्या माढरू युसुफ, गणेश शेट्टी आणि राशीद मलबारी याचेशी ओळख झाली.
जयेश कारागृहात असलेल्या पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडियाचा सचिव असलेला अफसर पाशा याचा संपर्कात आला. त्याने जयेशचा ‘ब्रेन वॉश’ करीत त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना धमकी देण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यानुसार धंतोली पोलिसांनी बंगरुळूमधील बेळगाव येथील कारागृहात जाऊन त्याची साक्ष नोंदविली होती.
दरम्यान जयेशवर ‘युएपीए’दाखल करण्यात आल्यावर तोही प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याने त्याची चौकशी करण्याच्या अनुषंगाने धंतोली पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्यानुसार आता अफसर पाशाला येत्या दोन दिवसांत नागपुरात (Nagpur) आणण्याची शक्यता आहे.
‘त्या’ महिलेचीही नोंदविली साक्ष..
जयेशच्या संपर्कात असलेल्या त्याच्या प्रेयसीच्या शोधासाठी पोलिसांनी (Police) मंगलोर आणि बंगरुळू येथेही पथक पाठविले होते. मंगलोरला गेलेल्या पथकाने प्रेयसीच्या घराची झडती घेतला होती. तिला ताब्यात घेत पोलिसांनी तिची साक्ष नोंदविली आहे.
कोण आहे अफसर पाशा?
बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया’चा सचिव असलेला अफसर पाशा ऊर्फ बशीरुद्दीन नूर मोहम्मदचा २००६ मधील ढाका आणि २०११ मध्ये बंगरुळू येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग होता. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी पाशा प्रोत्साहित करतो. त्याने २००६ पासून आतापर्यंत कारागृहातूनच कारवाया करीत अनेक युवकांना संघटनेत भरती केले आहे. त्याच्यावर कर्नाटकात युएपीए, स्फोटके बाळगणे आणि ३०७ अंतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.