Goregaon Congress News : गोरेगावातील काँग्रेसच्या तालुका मेळाव्यात रुसवे फुगवे, अनेक पदाधिकाऱ्यांची पाठ !

Satish Chaturvedi : पर्यवेक्षक म्हणून नियुक्त माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांचा गोरेगाव येथे दौरा होता.
Goregaon Congress News : गोरेगावातील काँग्रेसच्या तालुका मेळाव्यात रुसवे फुगवे, अनेक पदाधिकाऱ्यांची पाठ !
Published on
Updated on

Goregaon Congress News : गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथे आयोजित काँग्रेसचा मेळावा रुसव्या- फुगव्यांनी चांगलाच गाजला. याच रुसव्या-फुगव्यांपोटी अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला अनुपस्थिती दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गोंदिया काँग्रेसमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीकडून पर्यवेक्षक म्हणून नियुक्त माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांचा गोरेगाव येथे दौरा होता. यानिमित्त तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने पदाधिकारी मेळावा, हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह माजी आमदार सतीश चतुर्वेदी सहभागी झाले. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी चक्क पाठ दाखविली.

Goregaon Congress News : गोरेगावातील काँग्रेसच्या तालुका मेळाव्यात रुसवे फुगवे, अनेक पदाधिकाऱ्यांची पाठ !
Gondia Hawkers Zone : मतांच्या राजकारणात अडकले गोंदियाचे 'हॉकर्स झोन'

यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू असलेला मतभेद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळाव्याला अनुपस्थित राहिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेश कार्यकारिणीचे सचिव पी.जी. कटरे, अमर वराडे, विनोद जैन, पुरुषोत्तम कटरे, झामसिंह बघेले, जितेंद्र कटरे, डॉ. विवेक मेंढे, चंद्रशेखर गुड्डू बोपचे, माणिक बिसेन, राजीव ठकरेले, राजेश नंदागवळी, सुर्यप्रकाश भगत, अनिता मुनेश्वर, जीवन शरणागत, इंद्रजीत गणवीर, आनंद लांजेवार यांचा समावेश आहे.

याला कारणही तसेच आहे. गोंदिया जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप बंसोड यांच्याकडून सापत्न वागणूक देत जुन्या व वरिष्ठ कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप 5 महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षांवर करण्यात आला होता. एवढेच नव्हेतर काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अध्यक्षांच्या विरोधात बंड पुकारले होते. काहींनी आपल्या पदाचे राजीनामे सुद्धा दिले.

दरम्यान प्रदेश काँग्रेस कमेटीकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले असताना या प्रकरणाला थंड करण्याच्या दृष्टीकोणातून कोणत्याही विशेष हालचाली अद्याप झाल्या नाहीत. प्रकरण तसेच लांबविण्यात आले. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी कामाला लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठीच पर्यवेक्षक माजी आमदार सतिश चतुर्वेदी व प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे गोरेगाव तालुका काँग्रेस कमेटीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले होते. या मेळाव्याची तयारीही मागील 8 दिवसांपासून सुरू झाली होती. मात्र नियंत्रण पत्रिकेत पक्ष शिष्टाचाराला पाठ दाखविण्यात आली असल्याची ओरड सुरु झाली आहे. दूसरीकडे या कार्यक्रमाबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कसलीही माहिती देण्यात आली नाही. या अपमानास्पद वागणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील काही काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला पाठ दाखविल्याची चर्चा आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com