Congress Vs NCP "त्यांनी आमच्या भानगडीत पडू नये," नाना पटोलेंचा अजितदादांच्या नेत्याला थेट इशारा

Congress On Gondiya Assembly constituencies : गोंदिया विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले असल्यामुळे या मतदारसंघावर कुणी कितीही दावा केला तर तो काँग्रेसकडेच राहिल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
Nana Patole, Ajit Pawar
Nana Patole, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Gondiya News, 14 Sep : भाजपशी हातमिळवणी करून जिल्ह्याचे वाटोळे करणाऱ्यांना आता आमच्या भानगडीत पडू नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल (Praful Patel) पटेल यांना नाव न घेता दिला आहे.

शिवाय त्यांनी गोंदिया (Gondiya) जिल्ह्याचा सत्यानाश केल्याचा आरोप पटोलेंनी यावेळी केला. ते गोंदिया येथील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचाच असल्याचा दावा केला.

हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले असल्यामुळे या मतदारसंघावर कुणी कितीही दावा केला तर तो काँग्रेसकडेच (Congress) राहिल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तर या मतदारसंघाबाबात कोणी काय बोललं तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि कामाला लागा, असा सल्ला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेशानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तर गोपालदास अग्रवाल यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत करण्यात आलं. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार इत्यादी नेते उपस्थित होते.

Nana Patole, Ajit Pawar
Girish Mahajan : फडणवीसांच्या 'संकटमोचका'वर आलं 'संकट', गिरीश महाजनांनी काढाला पळ; नेमकं घडलं काय?

पक्ष प्रवेश नव्हे घरवापसी

काँग्रेसमध्येच प्रवेश करताच त्यांनी सर्वांची क्षमा मागत पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची व्याजासह परतफेड करेन असा शब्द उपस्थितांना दिला. ते म्हणाले, "विकासाच्या नावावर मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तो केवळ माझा भ्रम होता. माझ्या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्ते दुखावले होते. मी मनापासून त्या सर्वांची क्षमा मागतो. माझा हा पक्ष प्रवेश नसून घरवापसी आहे. पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची आता मी व्याजासह परतफेड करेन."

Nana Patole, Ajit Pawar
Ram Shinde Vs Rohit Pawar : 'या' निवडणुकीत त्यांना 'पाणीच पाज'; आमदार राम शिंदेंचं गणरायाला साकडं

आमच्या भानगडीत पडू नका

दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी नाव न घेता प्रफुल्ल पटेल यांच्यावर हल्लाबोल केला. या जिल्ह्याचा सत्यानाश केल्याचा आरोप त्यांनी पटेलांवर केला. भाजपाशी हातमिळवणी करून पटेल जिल्ह्याचे वाटोळे करत आहेत. मात्र, त्यांनी आता आमच्या भानगडीत पडू नये, असं पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com