Pune News : ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी रिहान अन्सारी याला काल मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज पुणे पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून रिहानचा ताबा घेतला. नाशिकचा ड्रग्ज कारखाना उभारण्यात अन्सारीचा मोठा वाटा होता. इतकेच नव्हे तर तो नाशिकमधून ड्रग्ज मुंबईत नेऊन विक्री करायचा. तसेच, ड्रग्ज विक्रीतून रिहानने आठ किलो सोने खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिहान अन्सारीनेच ललित पाटीलला नाशिकमध्ये कारखाना बांधायला मदत केली होती. ड्रग्स विक्रीतून मिळणारे पैसे, कारखान्याचीही सर्व जबाबदारी त्याच्याकडेच होती. २० ऑगस्टलाच मुंबई पोलिसांनी ठाण्यातून त्याला अटक केली होती. पुणे पोलिसांनी आज सकाळी मुंबई पोलिसांकडून रेहान अन्सारीचा ताबा घेतला. रेहानची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ललित पाटीलला ससूनमधून पळून जाण्यास मदत करण्याच्या संशयावरून प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम या दोन महिलांनाही पोलिसांनी अटक केली. दोघीही ललितच्या मैत्रिणी आहेत. ससूनमधून पळून गेल्यानंतर ललित दोन दिवस नाशिकमध्ये लपून बसला होता. त्यावेळी या दोघींनीच त्याची राहण्याची व्यवस्था केली होती. फोनच्या माध्यमातून ललित प्रज्ञा आणि अर्चना यांच्या संपर्कात होता, अशीही माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.