
Nagpur Hindu Sanghatna Morcha News : विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे‘ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘एक है तो सेफ है‘ या घोषणा चांगल्या गाजला होत्या. तर विरोधकांनी यावर आक्षेप घेतले होते.
या दोन्ही घोषणांमुळे मुस्लिम व अल्पसंख्याक नाराज होतील आणि याचा फटका भाजपच्या(BJP) उमेदवारांना बसेल अशी भीतीही व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षा याचा फायदाच झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पुन्हा हेच नारे मंगळवारी नागपूर शहरात लावण्यात आले. निमित्त होते बांगलादेशामध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाचे.
बांगलादेशातील हिंदूंसह अन्य अल्पसंख्यांक समाजांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मोर्चे काढून रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर व्हेरायटी चौकात एकत्रित सभा घेण्यात आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी एक है तो सेफ है....बटेंगे तो कटेंगच्या जोदरार घोषणा दिल्या.
यावेळी त्यांनी भलतेच लॉजिकही मांडले. बांगलादेशमध्ये १२ लाख सैनिक आहे. त्यापेक्षा जास्त कैदी आज भारतातील वेगवेगळ्या कारागृहांमध्ये आहेत. त्यांना मोकळे केले तरी बांगला देश साफ होईल. ढाकाच्या आत शिरून मारू, असा दमही त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे(RSS) अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बांगलादेशातील मंदिरांमध्ये जाळपोळ, महिलांवर अत्याचार झाले, त्यावर हिंदूसमाजाने फक्त दुःख व्यक्त करून भागणार नाही तर राग व्यक्त करावा लागेल असे सांगून बांगलादेशच्या विरोधात एकमत निर्माण करावे, असे आवाहन केले.
यावेळी आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश मंत्री, मुधोजीराजे भोसले, गोविंद शेंडे, प्रशांत चितळे, महंत शिवानंद महाराज, सविता मते, भदंत गौतम आदी उपस्थित होते. यावेळी आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश मंत्री, मुधोजीराजे भोसले, गोविंद शेंडे, प्रशांत चितळे, महंत शिवानंद महाराज, सविता मते, भदंत गौतम आदी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.