Lok Sabha Election 2024 : ‘होर्डिग्ज’च्या माध्यमातून आता महाविकास आघाडीला सवाल

Akola Constituency : शहरात लागलेल्या बॅनर्सची मोठी चर्चा. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत उपस्थित केले अनेक मुद्दे
Hordings in Akola
Hordings in AkolaSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडीचा जागा वाटपासंदर्भातील तिढा सुटलेला नाही. ‘वंचित’कडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चाच होत नसल्याचा आरोप होत आहे. वंचित आणि महाविकास आघाडीतील बोलणी होती तेथेच अडकली आहे. अशातच अकोला शहरात करण्यात आलेली ‘होर्डिंग्ज’बाजी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. महाविकास आघाडीला आता ‘होर्डिंग्ज’च्या माध्यमातून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू असतानाच अचानक दोघांमधील संवाद आता काही प्रस्तावावर अडकले आहेत. त्यामुळेच जागावाटपाची चर्चाही होत नसल्याचे समोर आले आहे. अकोल्यात लावण्यात आलेले ‘होर्डिंग’ सध्या चर्चेचे विषय ठरले आहेत. अकोला शहरात लावण्यात आलेल्या ‘होर्डिंग्ज’वर महाविकास आघाडीला विचारण्यात आलेले प्रश्न हे अकोलेकरांच्या माध्यमातून विचारण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. या ‘होर्डिंग्ज’च्या माध्यमातून नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, अशी चर्चाही आता शहरात होऊ लागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hordings in Akola
Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जोपर्यंत जागावाटप होत नाही, तोपर्यंत...

अकोला शहरात लावण्यात आलेल्या ‘होर्डिंग्ज’वर 'महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे. 2 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंतअंतर्गत बैठक आणि चर्चेतून वंचितला दूर का ठेवले? याचे उत्तर द्या, वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग असेल, तर अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा का जाहीर केला नाही? काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी का करत आहे? महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हारणाऱ्या 2 जागा का देऊ केल्या आहेत? त्या जागा महाविकास आघाडीतील तीनही पक्ष गेल्या 15-20 वर्षांपासून जिंकलेल्या नाहीत. त्या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथी मारण्याचा का प्रयत्न केला जातोय? असे काही प्रश्न ही या ‘बॅनर’च्या माध्यमातून विचारण्यात आले आहे.

अकोला शहरात हे ‘होर्डिंग्ज’ कुणी लावले याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र अकोलेकरांचे सवाल असल्याचे ‘होर्डिंग्ज’मधून सांगण्यात आले आहे. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट, अशोक वाटिका, बस स्थानक, पंचायत समिती, नेहरू पार्क, कृषी नगर, अकोला जिल्हा परिषदेजवळ हे बॅनर्स लागले आहेत. अकोल्यात वंचितला जाणीवपूर्वक बाहेर ठेवल्या जात असल्याची चर्चा होत आहे. तसेच महाविकास आघाडीने याचे उत्तर लवकर द्यावे अशी मागणी होत असल्याचे दिसून येत आहे. या ‘होर्डिंग्ज’वर अकोलेकरांकडून काही प्रश्न विचारण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र या फलकबाजीमागे वंचित बहुजन आघाडी असावी असा संशय व्यक्त होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Hordings in Akola
Prakash Ambedkar On Congress : प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसचं वावडं? थेट निशाणा साधत केला 'प्रहार'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde
mahayuti and mva
AAP leaders announce independent contest in Pune and other Maharashtra municipal corporations after MVA seat-sharing dispute.
Akola Shiv Sena
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com