Vijay Wadettivar: "मी माफी मागितलीच नाही"; चंद्रपूर महापालिकेतील गोंधळावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण

Vijay Wadettivar: दोन नेत्यांमधील वर्चस्वाच्या लाढाईत चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्ता गमावावी लागली. त्यांचा महापौरपदाचा उमेदवार एक मताने पराभूत झाला. याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : दोन नेत्यांमधील वर्चस्वाच्या लाढाईत चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सत्ता गमावावी लागली. त्यांचा महापौरपदाचा उमेदवार एक मताने पराभूत झाला. याची गंभीर दखल काँग्रेसने घेतली आहे. दोन्ही नेत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हायकमांडची माफी मागितल्याचा दावा केला जात होता. मात्र हे वृत्त वडेट्टीवार यांनी फेटाळून लावले. कोणीतरी ही बातमी पसरवली आहे. ज्याने कोणी ही अफवा पेरली त्याला पागल कुत्र्याने चावले असावे असा टोला त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना लगवला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर वडेट्टीवार काही नगरसेवकांना नागपूरला आले होते. त्यावरून चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्यात वादाला सुरुवात झाली.

Vijay Wadettiwar
Top 10 News: सोलापुरात आमदार पत्नीचा झेडपी अध्यक्षपदास नकार ते राज्यसभेचा 'सस्पेन्स' वाढला! शिवसेना, राष्ट्रवादीत नावांची जुळवाजुळव

वडेट्टीवार यांनी आपले समर्थक सर्वाधिक असल्याने महापौरपदावर दावा केला होता. मात्र खासदार धानोरकर यांना तो मान्य नव्हता. त्यानंतर धानोरकर यांना आपल्या १३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आणि गटनेताही निवडला होता. त्यानंतर प्रदेश काँग्रेसने या वादात उडी घेतली. दोन्ही नेत्यांसोबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठक घेतली. महापौरपद धानोरकर तर वडेट्टीवार यांना उपमहापौर व स्थायी समिती देण्याचे ठरवण्यात आले होते. हे दोन्ही नेत्यांनी सर्वांसमोर वरवर मान्य केले होते. मात्र संमती कोणाचीच नव्हती. शेवटी हा वाद दिल्लीपर्यंत पोहचला.

Vijay Wadettiwar
Hasan Mushrif: मुश्रीफांचा मास्टरस्ट्रोक! जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच?; सहा महिन्यापूर्वीच आखली होती रणनीती

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दोघांनाही दिल्लीत बोलावून घेतले होते. या बैठकीतही महापौरपद धोनरकर यांच्या समर्थकांना देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे वडेट्टीवारांचा नाईलाज झाला. सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या नगरसेवकांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी खासादारांवर सोपवण्यात आली. मात्र उद्धव ठाकरे सेनेची समजूत काढण्यात कोणालाच यश आले नाही. विजय वडेट्टीवार यांचे समर्थक अपक्ष निवडून आलेले दोन नगरसेवकही भाजपकडे गेले. त्यामुळे काँग्रेसला सर्वच गमावे लागले. या पराभवाची चौकशी करण्याचे आदेश प्रदेश काँग्रेसने दिले असून चौकशी समितीचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यानंतर वडेट्टीवार यांनी माफी मागून आपली सुटका करून घेतली अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र हे वृत्त वडेट्टीवारांनी फेटाळून लावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Wadettiwar vs Dhanorkar dispute
Congress leaders Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar
Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar amid political developments following Chandrapur Municipal Corporation mayoral election outcome.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com