Kirit Somaiya : उद्धव ठाकरे यांनी रचला होता 'व्होट जिहाद'चा गेमप्लान; किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

Nagpur BJP Kirit Somaiya Uddhav Thackeray Bangladeshi infiltrator : बांगलादेशी घुसखोरांना जन्मप्रमाणपत्रावरून भाजपचे किरीट सोमय्या यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.
Kirit Somaiya 1
Kirit Somaiya 1Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना 'व्होट जिहाद'साठी उद्धव ठाकरे शिवसेना, एमआयएम आणि काही मुस्लिम संघटांना 'गेमप्लान' तयार केला होता.

त्यानुसार तब्बल दोन लाख बांगलादेशी रोहिग्यांना जन्मप्रमाणपत्र देण्यात आल्याची धक्कादायक माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर 'व्होट जिहाद'कडे भाजपच्या (BJP) नेत्यांनी लक्ष वेधले होते. उद्धव ठाकरे शिवसेनेला टार्गेटसुद्धा करण्यात आले होते. राज्यात महायुतीची सत्ता येताच बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी मोहीम उघडली आहे. अमरावतीनंतर ते आज नागपूरमध्ये दाखल झाले होते.

Kirit Somaiya 1
Birth Certificate for Bangladesh Citizens : किरीट सोमय्या घुसखोरांच्या मागावर; मालेगावचे तहसीलदार निलंबित, तर आता मोर्चा यवतमाळकडे...

नागपूरचे (Nagpur) जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची त्यांनी भेट घेऊन कोणाला किती जन्माचे दाखले दिले याची माहिती दिली. याच 'व्होट जिहाद'च्या भरोशावर उद्धव ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीने लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांच्याच भरोशावर विधानसभा जिंकण्याचे मनसुबे उद्धव ठाकरे शिवसेनेने रचले होते, असाही आरोप सोमय्या यांनी केला.

Kirit Somaiya 1
Vijay Wadettiwar : "...तर महापालिकेत"; उद्धव ठाकरेंच्या 'एकला चलो'च्या वक्तव्यानंतर काँग्रेसनेही स्पष्ट केली आपली भूमिका

महाराष्ट्रात आतापर्यंत एक लाख 7 हजार रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. 90 हजार अर्ज अद्याप प्रलंबित आहे. मालेगावमध्ये गेलो होतो, तेव्हा ही बाब पुढे आली. दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचे कारस्थान रचले जात आहे. मालेगावचे तहसीलदार, नायब तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली असून ज्यांन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे, त्याचीही चौकशी केली जाणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

कटकारस्थान मालेगाव येथून...

आपण आतापर्यंत 37 तालुक्यांमध्ये जाऊन आलो. तेथून माहिती मिळवली. त्यात 99 टक्के बांगलादेशी मुस्लिमांकडे कुठलाही पुरावे आढळून आले नाही. त्यांना कशाचा भरोशावर जन्मप्रमाणपत्रे देण्यात आली असा सवाल त्यांनी केला. हे कटकारस्थान मालेगाव येथून सुरू झाले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यास एटीएसला सुचवण्यात आले आहे. मालेगावमध्ये जो बँक घोटाळा झाला तो पैसा यासाठी वापरण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

जन्म प्रमाणपत्रांसाठी आता गाईडलाईन...

यवतमाळमध्ये साडेतेरा हजार, अमरावतीला 15 हजार, अकोल्याला 15 हजार अकोला शहरात साडेचार हजार, अंजनगाव सुर्जीमध्ये 1400 रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हा खूप मोठा 'गेमप्लान' आहे. आता जन्म प्रमाणपत्र देण्याची सर्व प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. बांगलादेशी घुसखोराना मान्यता देण्याचा काम काही अधिकारी आणि काही राजकीय नेते करत आहे. 2024 मध्ये 20 लाख बांगलादेशी रोहिग्यांनी महाराष्ट्रात अर्ज केले. या लोकांना जन्मपत्र देण्यासाठी राजकीय व स्थानिक नेत्यांनी दबाव आणला होता, असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यापुढे कठोर गाईडलाईन तयार होत नाही, तोपर्यंत कोणालाही जन्म प्रमाणपत्र द्यायचे नाही, असा आग्रह आपण मुख्यमंत्र्यांकडे धरणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com