आमदार रवी राणांवरील गुन्ह्यासंदर्भात मी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणतेही निर्देश दिले नव्हते

आमदार रवी राणा यांच्यावरील गुन्ह्याबाबत चौकशी करून अहवाल मांडण्यात येईल : दिलीप वळसे पाटील
Ravi Rana-dilip walse patil
Ravi Rana-dilip walse patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारल्याप्रकरणी बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. महापालिका आयुक्तांवर शाई टाकल्यानंतर अमरावतीत वातावरण बिघडले होते, त्यामुळे कठोर कारवाई करण्याशिवाय पोलिसांकडे दुसरा मार्ग नव्हता. आमदार राणा त्यादिवशी दिल्लीत असताना त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला असेल तर तो कोणत्या परिस्थितीत दाखल झाला आहे, याची चौकशी करून अहवाल मांडण्यात येईल. याबाबत कुठलीही कृती करण्यासाठी मी किंवा मुख्यमंत्र्यांनी कोणतेही निर्देश दिले नव्हते, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज विधानसभेत सांगितले. (Inquiry will be held into the crime against MLA Ravi Rana : Dilip Walse Patil)

आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचा विषय त्यांनी स्वतः आज विधानसभेत मांडला होता. तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर भाष्य करत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरील उत्तर दिले.

Ravi Rana-dilip walse patil
राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदमांची शिवीगाळ प्रकरणातून दोषमुक्तता

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय राज्यात कुठलाही पुतळा बसवता येत नाही, हा राज्याचा नियम असून तो सगळीकडे पाळला जातो. या पुतळ्याची उंची इतकी लहान होती की, रस्त्यावर चालता चालता त्या पुतळ्याला कुणाचाही हात लागू शकत होता. त्यामुळे प्रशासनाने निर्णय घेऊन अमरावती महापालिकेच्या आयुक्तांनी नियमाप्रमाणे पुतळा हटवला, त्यासाठी त्यांनी पोलिस संरक्षण मागितले होते. आयुक्तांनी नियमांप्रमाणे त्यांच्या अधिकारात कारवाई केली आहे, असा दावाही गृहमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना केला.

Ravi Rana-dilip walse patil
बिनविरोध निवडून आलेला कुणाचा? शिवसेना-राष्ट्रवादीला समान जागा मिळताच जुंपली

ज्यादिवशी मनपा आयुक्तांवर शाई टाकण्यात आली, त्यादिवशी अमरावतीमध्ये असे वातावरण निर्माण झाले होते की, पोलिसांना कठोर कारवाई करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तरीही आमदार रवी राणा त्यादिवशी दिल्लीत असताना त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल झाला असेल, तर तो कोणत्या परिस्थितीत दाखल झाला, याची चौकशी करावी लागेल. या संदर्भात कुठलीही कृती करण्यासाठी मी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही निर्देश दिले नव्हते. जेव्हा राज्याच्या एखाद्या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होतो, परिस्थिती स्फोटक होते, तेव्हाच मुख्यमंत्री वा गृहमंत्री त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Ravi Rana-dilip walse patil
बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीत फूट ; शिवसेनेला डावलून काॅंग्रेसने केला अध्यक्ष..

यानंतरही सभासदांच्या भावना लक्षात घेऊन अतिरिक्त महासंचालक, कायदा व सुव्यवस्था यांच्याकडून याप्रकरणाची चौकशी करुन, त्यांच्या अहवालावर विरोधी पक्षनेते यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, अशी भूमिका गृहमंत्री वळसे पाटील यांनी विधानसभेत बोलताना मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com