Irshalwadi landslide : मुंबईच्या उपनगरांसह चंद्रपूर-गडचिरोलीवरही सरकारची नजर, मुनगंटीवारांचे सांघिक कामाचे आदेश !

Raigad Irshalwadi landslide : दर तीन तासांनी स्थिती बदलतेय.
Irshalgad accident
Irshalgad accidentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अजूनही काही लोक मलब्याखाली दबले असल्याची माहिती आहे. आज सकाळपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सात ते आठ मंत्री दुर्घटनास्थळावर बचाव कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. अतिवृष्टीच्या या परिस्थितीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबईच्या सर्व उपनगरांसह गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावरही सरकारची नजर आहे. (The government is also watching Gadchiroli and Chandrapur districts)

चंद्रपूरमध्ये एका दिवसातील अतिवृष्टीमुळे २४० मिलिमीटर पाऊस पडला. यात ३२० घरांमध्ये पाणी शिरले. चंद्रपूर शहरात एका घराचे पूर्ण नुकसान झाले असून ४७ घरांचे किरकोळ नुकसान झालेले आहे. तर आतापर्यंत १ जूनपासून झालेल्या पावसामुळे ८०४ घरांचे नुकसान झाले आहे. कालच्या (ता. १९) अतिवृष्टीत जीवितहानी झाली नाही. अशा परिस्थितीत सर्व विभागांनी एकत्र येऊन सांघिक काम करण्याचे आदेश वनमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

आज विधान परिषदेच्या सभागृहात माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर सर्व परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. रत्नागिरीत काही शहर पाण्याखाली आहेत. धोक्याच्या पातळीपर्यंत पाणी गेले होते. पण बऱ्याच ठिकाणी धोक्याच्या पातळीखाली पाणी आले आहे. हवामान खात्याने काल रेड अलर्ट दिला होता, आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. दर तीन तासांनी स्थिती बदलतेय. शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.

इर्शाळवाडीला मदतकार्यासाठी मशीन पोहोचवण्याची व्यवस्था होत नाहीये. मशीन साडेतीन टन वजनाची आहे. तेवढ्या क्षमतेचे हेलिकॉप्टर पंजाबला आहे, ते मागवण्यात आले आहे. दुसऱ्या दीड ते पावणेदोन टन वजनाच्या मशीन्स आहेत त्या मशीन घटनास्थळी नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ४५ कुटुंबातील २२८ पैकी काही लोक नोकरीला कामाला जातात, अशी माहिती मिळाली आहे. आम्ही सगळे परिस्थितीवर बारीक लक्ष ठेऊन आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.

Irshalgad accident
Irshalwadi Landslide Update: इर्शाळवाडीतून ८० जणांना बाहेर काढले ; दहा जणांचा मृत्यू

रायगड, पालघर, रत्नागिरी, गडचिरोली, (Gadchiroli) चंद्रपूर (Chandrapur) आणि कोकणात सतत पाऊस पडतोय. अजून तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. इर्शाळवाडीसारखी धोकादायक ठिकाणे जी पाहणीत आढळली, तेथेही सरकारची नजर आहे. राज्यातल्या (Maharashtra) जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे करावं लागेल, ते करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असेही पवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.