Nagpur News : लोकसभा निवडणुकीनंतर आता लवकरच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. आजवर कुठल्याच निवडणुकीत यश मिळाले नसले तरी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या जय विदर्भ पार्टीच्यावतीने विधानसभेची निवडणूक लढण्याचे जाहीर केले. विदर्भातील सर्व 62 मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा (Bjp) दारूण पराभव करण्यास पक्षाला यश आल्याचा दावा करण्यात आला. आजपर्यंत राजकीय समीकरणातूनच नव्या राज्याची निर्मिती झाली. (Jai Vidhrbha Party News)
बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांची सत्ता प्रबळ होत असताना बघून झारखंडची निर्मिती करण्यात आली. तर मध्यप्रदेशीतील छत्तीसगड त्याचप्रमाणे उत्तरप्रदेशमधून उत्तराखंड ही राज्ये निर्माण झाली.
भाजपला या मोठ्या राज्यांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करायची होती. स्थानिक नेत्यांना कमजोर करायचे होते, असे यावेळी केदार यांनी सांगितले. 2014 च्या निवडणुकीपूर्वी भाजपने केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यावर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल, असे आश्वासन दिले होते. भाजपच्या उमेदवारांनी तसे शपथपत्रसुद्धा भरून दिले होते. सत्ता आल्यावर भाजपने घुमजाव केले.
भाजप आणि काँग्रेस (Congress) दोन्ही पक्षांचा विदर्भ राज्याच्या निर्मितीला विरोध असल्याने जय विदर्भ पार्टीच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवावे, असे आवाहन यावेळी केदार यांनी यावेळी केले. महागाई, वीज दरवाढ तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी जय विदर्भ पार्टीच्यावीतने सातत्याने आंदोलने केली जात आहेत. नेत्यांच्या घरासमोर मोर्चे काढले जात आहेत.
विरोधात असताना भाजपने विदर्भवादी संघटनांना बळ दिले होते. काँग्रेस विरोधी बाकावर गेल्यानंतर काही स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख, माजी केंद्रीयमंत्री स्व. वसंत साठे, माजी खासदार स्व. एन. के. पी. साळवे हेसुद्धा एकेकाळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.