Karanja Constituency News : पाटणींच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कारंजात कोण असेल भाजपचा चेहरा?

Sumit Wankhade : कारंजात अमोल पाटणकर, तर वर्ध्यात सुमीत वानखडेंची चर्चा !
Amol Patankar, Dnyayak Patni and Narendra Golchha.
Amol Patankar, Dnyayak Patni and Narendra Golchha.Sarkarnama
Published on
Updated on

Karanja Constituency News : कोणतेही राजकीय पाठबळ नसताना सलग तीन वेळा कारंजा मतदारसंघाचे आमदार म्हणून राजेंद्र पाटणी यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. सलग दोन वेळा भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. मात्र, त्यांचं दीर्घ आजाराने नुकतंच निधन झालं आहे. राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर आता हा मतदारसंघ रिक्त झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचा राजकीय वारस कोण या चर्चांना उधाण आले आहे.

वाशीम जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून कारंजा शहराची ओळख आहे. मानोरा आणि कारंजा हे दोन तालुके मिळून कारंजा मतदारसंघ तयार झाला आहे. पाटणी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. पूर्वी अकोला जिल्ह्यात समाविष्ट असलेला कारंजा या मतदारसंघाची निर्मिती 1978मध्ये झाली. आतापर्यंत या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या पक्षांचे उमेदवार निवडून आलेले आहेत.

2014 आणि 2019च्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव असल्याने या मतदारसंघात भाजपने वर्चस्व राखलं. आमदार राजेंद्र पाटणी यांच्या रूपाने या मतदारसंघाला भाजपचे नेतृत्व लाभलं. मात्र, दीर्घ आजाराने आमदार राजेंद्र पाटणी यांचं नुकतंच निधन झालं. आता हा मतदारसंघ रिक्त झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपकडून पुढचा उमेदवार कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Patankar, Dnyayak Patni and Narendra Golchha.
Washim : काँग्रेसच्या पारंपरिक गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपकडून वऱ्हाडात रणनीती

कारंजा मतदारसंघाचा विचार केला, तर एखादा अपवाद वगळला तर या मतदारसंघात स्थानिक सोडून मतदारसंघाबाहेरील उमेदवार आमदार म्हणून निवडून येतात, असाच इतिहास राहिला आहे, तर पाटणी यांच्यापूर्वी हा शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यायचा. मात्र, 2014 मध्ये भाजपकडून राजेंद्र पाटणी निवडून आल्याने भाजपने 2019मध्येही या मतदारसंघात दावा केला होता.

भाजपकडून पाटणी की पाटणकर?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पाटणी हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारपणामुळे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांचे सुपुत्र ज्ञायक पाटणी हे मतदारसंघात सक्रिय होते. ज्ञानक यांच्या मतदारसंघातील सक्रियतेमुळेही चर्चा होऊ लागल्या होत्या. मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन ज्ञायक यांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ज्ञायक हे भाजपचा चेहरा असल्याची चर्चाही सुरू झाली होती.

भाजपकडून ज्ञायक राजेंद्र पाटणी यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली असली तरी अमोल पाटणकर यांचाही या मतदारसंघात सहभाग वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमोल पाटणकर हेही या मतदारसंघात सक्रिय झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. अमोल पाटणकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील अवर सचिव आहेत. पाटणकर हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात.

पाटणकर हे मूळचे मानोरा तालुक्यातील कोंडोली गावचे आहेत. त्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक म्हणून ते जबाबदारी सांभाळतात. लोकांची कामे करणारा कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळे वर्ध्यात सुमीत वानखडे आणि कारंजात अमोल पाटणकर, अशी चर्चाही सुरू आहे, तर भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, राजेंद्र पाटणी यांचे उत्तराधिकारी म्हणून भाजप कुणाला संधी देते, यावरदेखील बरेच गणित अवलंबून राहतील.

Amol Patankar, Dnyayak Patni and Narendra Golchha.
Yavatmal-Washim LokSabha Constituency : भावना गवळींची ‘जायंट किलर’ उपाधी कायम राहील का?

भाजप पाटणी यांच्या कुटुंबात उमेदवारी देणार की इतरांना संधी दिली जाईल, हे पाहावे लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कारंजा मानोरा मतदारसंघात लढण्यासाठी भाजपमध्ये अनेक नेते इच्छुक आहेत. दरम्यान, या मतदारसंघात प्राबल्य राखण्यात भाजपची मात्र चांगलीच दमछाक होण्याची शक्यता आहे, तर महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही या मतदारसंघावर दावा करण्याची दाट शक्यता आहे.

Edited By : Atul Mehere

R

Amol Patankar, Dnyayak Patni and Narendra Golchha.
Washim : शरद पवार गटच नव्हे, महाविकास आघाडीत संचारला जोश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com