Kripal Tumane : ... म्हणून कृपाल तुमाने आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या निरोपाच्या प्रतीक्षेत!

Chief Minister, Deputy Chief Minister and Kripal Tumane : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुमाने यांना दिला होता 'तो' शब्द, जाणून घ्या नेमका काय आहे विषय?
Kripal Tumane CM Shinde
Kripal Tumane CM ShindeSarkarnama

रामटेक लोकसभेची जागा सोडणारे माजी खासदार कृपाल तुमाने यांना आमदारकी आणि राज्यात मंत्रिपदाचे आश्वसान देण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिला होता. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असल्याने ते मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करीत आहेत.

तुमाने रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. मुख्यमंत्र्यांसोबत ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले होते. शिंदे गटात खासदारांना आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे ते समन्वयक होते. रामटेकच्या उमेदवादीरीची माळ पुन्हा त्यांच्याच गळ्यात पडणार असेच सर्वांना अपेक्षा होती.

मात्र भाजपने(BJP) त्यांच्या नावाला विरोध केला. त्यांच्याऐवजी काँग्रेसच्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र ते आता पराभूत झाले आहेत. जागा सोडण्यासाठी तुमाने यांची समजूत घालण्यात आली होती. त्यांना आमदार करण्यात येईल आणि मंत्रिमंडळातही सामावून घेण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिली होता. याकरिता तुम्हाला जास्त दिवस वाट बघावी लागणार नसल्याचेही आश्वासन देण्यात आले होते.

Kripal Tumane CM Shinde
Chandrasekhar Bawankule: सरकारमध्ये फडणवीस का आवश्यक ? बावनकुळेंनी सांगितला भाजपचा प्लॅन

याशिवाय 'दरम्यानच्या काळात शिवसैनिकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी तुम्हाला जागा सोडण्याचा पश्चाताप होणार नाही, योग्य वेळी पुनर्वसन केले जाईल असे जाहीरपणे सांगितले होते. आता रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मंत्रिमंडळाचासुद्धा विस्तार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तुमाने यांचे सर्व लक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दाकडे लागले आहे.'

सध्या तुमाने मुंबईत आहेत. शिवसेनेच्या(Shivsena) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आपल्याला अद्याप कोणाचाच निरोप आला नसल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेच्या आमदारांना विधान परिषदेसाठी उमेदवार निवडून द्यायचा आहे.

Kripal Tumane CM Shinde
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमधून खोपडे की मेघेंची वर्णी लागणार ?

निवडणूक आयोगाने 11 जुलै मतदानाची तारीख जाहीर केली आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. शिंदे सेनेकडे 40 आमदारांचे पाठबळ आहे. त्यांचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो. आता फक्त उमेदवार कोण याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com