Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात नागपूरमधून खोपडे की मेघेंची वर्णी लागणार ?

Mahayuti Government : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच मंत्रिमंडळात आमदार कृष्णा खोपडे यांचा नंबर लागेल असे बोलले जात होते.
MLA Krushna Khopde - Sameer Meghe
MLA Krushna Khopde - Sameer MegheSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नागपूर जिल्ह्यातून कुठल्या आमदारांचा नंबर लागणार याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. मंत्रिमंडळात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांची नावे सध्या जोरदार आघाडीवर असून यापैकी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.

आमदार कृष्णा खोपडे पूर्व नागपूरमधून तिसऱ्यांदा निवडूण आले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असताना त्यांचे नाव सातत्याने चर्चेत येत होते. मात्र स्वतः फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असे जिल्ह्यातील दोन वजनदार नेते मंत्रिमंडळात असल्याने खोपडे यांना उपेक्षित राहावे लागले.

गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्य खोपडे यांच्या मतदारसंघाने मिळवून दिले आहे. ते गडकरी यांचे समर्थकसुद्धा आहेत. आता बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे खोपडे यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच विस्तारात खोपडे यांना नंबर लागले असे बोलले जात होते.

MLA Krushna Khopde - Sameer Meghe
Devendra Fadnavis on Mission Nagpur : ‘मिशन नागपूर’साठी देवेंद्र फडणवीसांकडून हालचालींना वेग ; मुंबईत विशेष बैठक!

रामटेक लोकसभेत महायुतीचा उमेदवार पराभूत झाला आहे. आमदार समीर मेघे यांच्या हिंगणा मतदारसंघातून आघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. मेघे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी विडा उचलला आहे.

मेघे यांच्या विरोधात आपण स्वतः लढणार असल्याची घोषणा करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. ते स्वतः लढतील किंवा स्वतःच्या समर्थकाला उमेदवारी देतील हे नंतर ठरले, परंतु केदारांचा नागपूर जिल्ह्यात चांगलाच दबदबा आहे.

MLA Krushna Khopde - Sameer Meghe
Video Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकरांच्या भावाची अधिकाऱ्यांना दमबाजी अन् शिवीगाळ; कार्यकर्त्यांनं लगावली कानशिलात

लोकसभेत श्यामकुमार बर्वे यांना निवडूण आणण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले होते. ते यात यशस्वीसुद्धा झाले आहेत. हिंगणा मतदारसंघात मेघेंच्या पराभवासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. हे बघता मेघे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचे हात बळकट केले जाऊ शकतात.

ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे भाजपातील सर्व नेत्यांसोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मेघे यांच्या नावाला कोणी विरोध करणार नाही असे दिसते. हे खरे असले तरी जिल्ह्यातील आपले महत्त्व कमी होऊ नये यासाठी भाजपचेच काही प्रस्थापित नेत्यांचा त्यांच्या नावाला छुपा विरोध असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com