Vanchit Bahujan Aghadi : चेन्नीथला-ठाकरे भेट, ‘वंचित’ म्हणते ‘फिर क्या बचा’

Lok Sabha Election 2024 : मातोश्रीवर भेटले दोन महत्त्वाचे नेते
Vanchit Bahujan Aghadi on MVA
Vanchit Bahujan Aghadi on MVASarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे घोडे अजून अडलेले आहेत. अशात यासर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीकडून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा ‘फॉर्म्यूला’ ठरला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ट्विटर या सोशल माध्यमातून ट्विट करीत ‘वंचित’ने हा दावा केला आहे. ‘फिर क्या बचा’ असा सवालही ‘वंचित’कडून करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. अशातच सर्वच पक्षांकडून युती, आघाडीतील जागा वाटपाचा ‘फॉर्म्यूला’ ठरविण्याच्या कामाला वेग आला आहे. महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश झाल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ‘वंचित’कडून येत असलेल्या अटी-शर्तींमुळे जागावाटपावर तोडगा निघालेला नाही.

Vanchit Bahujan Aghadi on MVA
Lok Sabha Election 2024 : ‘वंचित’मधील प्रवेशाने ‘ते’ मनोज जरांगे पाटील ‘प्रकाश’झोतात

आता ‘वंचित’कडून महाविकास आघाडीला 39 मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनाम्याचा मसुदा सादर करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी आणि उद्धव ठाकरे यांची (ता.10) रोजी मातोश्रीवर भेट झाली आहे. याभेटीत महाविकास आघाडीतील जागावाटपावरून महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडीने भेटीतच सर्व काही ठरल्याचा दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस मध्ये जागावाटप झाल्याचे म्हटले आहे.

‘वंचित’कडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांच्या भेटीची बातमी पोस्ट करीत या बैठकीपासून आम्हाला का वंचित ठेवण्यात आले? असा प्रश्न विचारला आहे. काँग्रेसने 24 आणि शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने 23 जागांची मागणी केल्याची बातमी खरी आहे का? असेही विचारण्यात आले आहे. हे खरे असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यासाठी काय उरले आहे? असा देखील प्रश्न ‘वंचित’कडून विचारण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोशल मीडिया पोस्टनंतर पुन्हा ‘वंचित’ने काँग्रेस आणि शिवसेनेवर संशय व्यक्त केला आहे. आधीच जागावाटपावरून महाविकास आघाडीत घोडे अडले असताना आता पुन्हा ‘वंचित’कडून शिवसेना आणि काँग्रेसला प्रश्न विचारून डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 23 आणि 24 ‘फॉर्म्यूला’ या दोघांमध्ये ठरल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Vanchit Bahujan Aghadi on MVA
Vanchit Bahujan Aghadi : ‘वंचित’च्या ‘मिनिमम’मध्ये ‘मॅग्झिमम’ मागण्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com