Lok Sabha Election 2024 : भावना गवळींच्या कार्यक्रमाकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पाठ

Bhavna Gawali : ‘मेरी झांशी, नही दूंगी’ म्हणणाऱ्या ताईंवर स्वकीयांचीच उघड नाराजी
Bhavana Gawali.
Bhavana Gawali.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : जिल्ह्यातील नेर येथे यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या पुढाकाराने एक कार्यक्रम पार पडला. वरकरणी या कार्यक्रमाचे आयोजन जरी प्रशासनाने केल्याचे दिसत असले तरी वास्तविकता मात्र काही वेगळीच होती. कार्यक्रम पत्रिकेत महायुतीच्या सर्वच लोकप्रतिनिधींची नावे होती. मात्र, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे ‘मेरी झांशी, नही दूंगी’ असे म्हणत विरोधकांना आव्हान देणाऱ्या ताईंवर स्वकीयांचीच उघड नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार म्हणून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची राज्यात ओळख आहे. सलग चारदा मतदारसंघांतून निवडून आल्याने पक्षात त्यांचे वजन आहे. मात्र, त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास बघता मतदारसंघाशी त्यांचा तुटलेला संपर्क खासकरून जिल्ह्यात त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मतदारांना अदृश्य झालेल्या खासदार आता निवडणूक तोंडावर येताच नजरेस पडत आहेत. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात अनेकदा मतदारांच्या संतापाला सामोरे जावे लागले आहे. यातच आता खुद्द स्वपक्षासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या संतापाला गवळींना सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhavana Gawali.
भावना गवळी बांधावर पोहोचल्या ; शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली| Bhavana Gawali |

नेर येथे नुकताच खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांगांना साहित्य वाटपाचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रत पंचायत समितीच्या बचत भवनामधे आयोजित केला गेला होता. कार्यक्रमाचे नियोजन स्थानिक प्रशासनाकडून केले गेले असले, तरी कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिका छापल्या गेल्या. यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वतः खासदार भावना गवळी होत्या. विशेष उपस्थितीत माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे, ‘रिपाइं’चे विदर्भ अध्यक्ष मोहन भोयर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष बिपिन चौधरी, महेंद्र मानकर, महिला जिल्हा प्रमुख वैशाली मासाळ यांच्यासह नेर तालुका शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

गवळींच्या या कार्यक्रमाला रिपाइंचे मोहन भोयर वगळता महायुतीत असलेल्या पक्षांच्या जिल्हा प्रमुखांसह स्थानिक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे राजकीय गोटात ‘ताईं’बाबत असलेली प्रचंड नाराजी पुन्हा एकदा समोर आल्याची बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम मतदारसंघाला स्वतःची ' ‘झाशी’ म्हणवून घेणाऱ्या ताई झाशीतच स्वत:च्या पक्षासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करीत आहेत. ‘ताई’ आणि ‘भाऊ’चा वाद हा जिल्ह्यासाठी नवीन नाही. पालकमंत्री संजय राठोड यांची मतदारसंघावर असलेली पकड आणि भावनाताईंचा मतदारसंघात तुटलेला संपर्क याची चाचपणी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याआधीच केली आहे. त्यामुळेच यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार शोधण्याची चर्चा पुढे आली आहे.

Bhavana Gawali.
Yavatmal : खासदार भावना गवळी यांना पुन्हा नोटीस; यावेळी कुणी मागितला हिशोब?

ताईंची अनुपस्थितीची चर्चा

दोन दिवसांपूर्वी नेर येथे शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि पक्ष प्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमातदेखील भावना गवळी केवळ पोस्टर पुरत्याच मर्यादित होत्या. त्यांची अनुपस्थिती राजकीय गोटात चर्चेची ठरली आहे. एवढेच नव्हे तर नुकताच बाभूळगाव येथे अवकाळी पाऊस आणि गारपिटीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ताईंना उपस्थित शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्याचा व्हिडिओदेखील समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. भावनाताईंबद्दल मतदारांत असलेली नाराजी बघून पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर दिग्रस विधानसभेवर हक्क कोणत्या अधिकाराने त्या सांगतील? असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Bhavana Gawali.
Nagpur Politics: गडकरी, मेंढे, भावना गवळी, अशोक नेतेंना पाडण्यासाठी विदर्भात काँग्रेसची फौज मैदानात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com