Eknath Shinde letter : लाडक्या बहिणींचा संजय राठोड यांच्यावर रोष; उपमुख्यमंत्री शिंदे यांना लिहले रक्ताने पत्र

Sisters Write to Eknath Shinde Expressing Anger Against Yavatmal Shiv Sena Minister Sanjay Rathod : यवतमाळ शहरातील लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून आपल्या आपल्या व्यथा कळविल्या आहेत.
Eknath Shinde letter
Eknath Shinde letterSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Sanjay Rathod news : विधानसभेच्या निवडणुकीत लडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी चांगलीच फायद्याची ठरली. आता मात्र लाडक्या बहिणींना पैसे वाटप करताना मोठी अडचण येत आहे. या योजनेचे रॅशनिंग केले जात आहे. दुबार लाभ घेणाऱ्या महिलांचा शोध घेतल्या जात आहे.

सरकारी कर्मचारी असताना लाभ घेतलेल्या बहिणींना यातून वगळे जात आहे. ही योजना आता सरकारसाठी डोकोदुखी ठरू पाहत असताना यवतमाळ शहरातील लाडक्या बहिणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून आपल्या आपल्या व्यथा कळविल्या आहेत.

सोबतच आमचा रोजगार हिसकावू नका अशी विनंती केली आहे. आता उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आपल्या लाडक्या बहिणींसाठी काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे बेरोजगार झालेल्या सर्व महिलांचा रोष यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर आहे.

यवतमाळमधील आझाद मैदानात असलेल्या व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (Election) रोजगारासाठी हातगाडीवर दुकाने लाऊ दिली जाईल, असे महिलांना देण्यात आले होते. येथील आझाद मैदानात जवळपास 50 वर्षांपासून दुकान लावून शेकडो महिला आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होत्या.

Eknath Shinde letter
Uddhav Thackeray EVM hacking claim : 'EVM' हॅकचं प्रत्याक्षिक भाजप नेत्यानं दाखवलं; उद्धव ठाकरेंनी आणखी एक वादाला तोंड फोडलं

काही दिवसांपूर्वी या आझाद मैदानाच्या सोभवातलचे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी पालकमंत्री दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करून दिली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले होते.

Eknath Shinde letter
Uddhav Thackeray On BJP Fadnavis : मुख्यमंत्र्यांना तोंड दाखवायला जागा नाही, ते फक्त दुसऱ्यांच्या पापावर पांघरूण घालतायत; भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभारावरून ठाकरेंचा टोला

दररोज हातगाडीवर व्यवसाय करण्याची व्यवस्था करून दिली जाईल असा शब्दही त्यांनी दिला होता. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही आदेशाचे पालन करून आझाद मैदानातील जागा रिकामी करून दिली. आम्ही दुसऱ्यांदा भेट घेतली असता मैदानाच्या जवळ जागा मिळणार नाही, पण तुम्हाला खाऊगल्ली तयार करून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. प्रत्यक्षात अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

परिणामी, आमच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे, लाडक्या बहिणीला न्याय द्यावा, अशी मागणी महिलांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठविल्याची माहिती श्रद्धा लोळगे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com